सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठी ही मोठी संधी आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर २५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता, ती अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जासाठी ‘एनएससीएल’ ची अधिकृत बेवसाईट https://www.indiaseeds.com/ ही आहे तर भरतीचे सर्व तपशील https://drive.google.com/file/d/1tPEnS5SnsD8XWyO1Exrf4oG7EQFg6Hoy/view या लिंकवर तुम्हाला वाचता येतील.
राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या या भरतीचे सर्व तपशील पुढीलप्रमाणे:
राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२३ मधील रिक्त पदे आणि त्यांचे विभाग आणि पदसंख्या
ज्युनिअर ऑफिसर :
लीगल – ४
विजिलेंस – २
मॅनेजमेंट ट्रेनी :
मार्केटिंग – १५
इलेक्ट्रिकल इंजिनीअर – १
सिव्हिल इंजिनीअर- १
ट्रेनी :
अग्रीकल्चर – ४०
मार्केटिंग – ६
क्वालिटी कंट्रोल – ३
स्टेनोग्राफर – ५
अग्री स्टोअर – १२
एकूण पदे – ८९
(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)
शैक्षणिक पात्रता
(उमेदवाराने पात्रता अटीतील पदवीमध्ये ६० टक्के गुणांसह उतीर्ण असणे गरजेचे आहे.)
ज्युनिअर ऑफिसर
लीगल : विधी पदवी + १ वर्ष अनुभव.
विजिलेंस : कोणत्याही शाखेतील पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव.
मॅनेजमेंट ट्रेनी
मार्केटिंग : कृषी विषयात पदवी आणि मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट विषयात MBA किंवा मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/ डिप्लोमा किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी.
इलेक्ट्रिकल इंजिनीअर : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी आणि एमएस ऑफिस.
सिव्हिल इंजिनीअर : सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी आणि एमएस ऑफिस.
ट्रेनी
अग्रीकल्चर, मार्केटिंग, क्वालिटी कंट्रोल, स्टेनोग्राफर या पदांसाठी कृषी विषयात पदवी आणि एमएस ऑफिस
अग्री स्टोअर या पदासाठी १२ पास सोबत ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, स्टेनोग्राफी.
किंवा
पदवीधर, इंग्रजी शॉर्टहैंड ८० श.प्र.मि. टंकलेखन आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा:
ज्युनिअर ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी १८ ते ३० वर्षांपर्यंत वयोमार्यादा आहे.
ट्रेनी पदांसाठी १८ ते २७ वर्षांपर्यंत वयोमार्यादा आहे.
पात्रतेच्या कमाल वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची सूट तर मागासवर्गीयांना ५ वर्षांची सूट आहे.
भरतीसाठी अर्जाचे शुल्क:
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS यांना ५०० रुपये अर्ज शुल्क तर मागासवर्गीय/ PWD यांना अर्ज शुल्क माफ आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
(वाचा: CS Exam Topper: ऐन परीक्षेत तब्येत बिघडूनही मानली नाही हार, ‘सीएस’ परीक्षेत प्रथम आलेल्या राशीची यशोगाथा..)