वनप्लस आणि रियलमीला टक्कर देण्यासाठी Vivo सज्ज; V29e 5G ची दणक्यात भारतात एंट्री

मोबाइल निर्माता विवोनं मिडरेंज सेगमेंटमध्ये आपला नवा स्मार्टफोन Vivo V29e भारतीय बाजारात लाँच केला आहे. ह्या डिवाइसची खासियत म्हणजे ह्यात कलर चेंजिंग बॅक पॅनल देण्यात आला आहे. तसेच अत्यंत स्लिम डिजाइन असून देखील ह्यात 3D कर्व डिस्प्ले देण्यात आहे. स्पेक्स आणि डिजाईनच्या जोरावर विवो व्ही२९ई रेडमी, वनप्लस आणि रियलमी फोन्सना चांगली टक्कर देऊ शकतो.

Vivo V29e 5G ची किंमत

विवो व्ही२९ई चे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. त्यातील ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २८,९९९ रुपये आहे. हा फोन आजपासून प्री बुक करता येईल. तर ह्याची विक्री विवोच्या वेबसाइटसह फ्लिपकार्ट रिटेल स्टोर्सवरून ७ सप्टेंबरपासून सुरु होईल.

वाचा: Smart TV स्लो चालतोय? ‘या’ ३ स्टेप्स फॅालो करुन सुपरफास्ट करा तुमचा स्मार्ट टीव्ही

Vivo V29e 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V29e मध्ये 3D कर्व डिजाइनचा वापर करण्यात आला आहे. ह्याची स्क्रीन ५८.७ डिग्री पर्यंत वळली आहे. ह्या अल्ट्रा स्लिम मोबाइलची जाडी फक्त ७.५७एमएम आणि वजन १८०.५ ग्राम आहे. फ्रंट पॅनल पाहता विवो व्ही२९ई स्मार्टफोन पंच-होल डिस्प्लेसह येतो. बॅक पॅनलवर वर्टिकल शेप असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, तर उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. फोन ड्युअल टोन फिनिशसह येतो.

विवो व्ही२९ई मध्ये ६.७८ इंचाचा कर्व अ‍ॅलोमेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यावर १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २४०२ x१०८० पिक्सलसह एफएचडी प्लस रिजॉल्यूशन मिळतं. इतकच नव्हे तर १३०० निट्झ पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Vivo V29e 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर ६ एनएम प्रोसेसवर बनला आहे आणि २.२गिगाहर्ट्झचा कमाल क्लॉकस्पीड देतो. त्याचबरोबर ८जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. एक्सपांडेबल रॅम फिचरच्या मदतीनं ८जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर चालतो.

वाचा: शाओमी करणार कमाल! परवडणाऱ्या किंमतीत 18GB RAM आणि 200MP कॅमेरा; Redmi Note 13 Pro सीरिज लीक

विवो व्ही२९ई मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आला आहे. तर मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन असलेला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे. तर जोडीला ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर मिळतो. फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी, ४४वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.

Source link

vivovivo v29e 5g pricevivo v29e 5g price in indiavivo v29e pricevivo v29e price in india
Comments (0)
Add Comment