माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलेल्या या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी तुमच्याकडे जनसंवाद कौशल्य, पत्रकारिता शिक्षण, कला, भाषा तज्ज्ञता अशा काही प्रमुख गोष्टी अवगत असणे गरजेचे आहे. तेव्हा जाणून घेऊया या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करायचा..
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती २०२३ मधील पद आणि पदसंख्या
यंग प्रोफेशनल – ३३ जागा
(वाचा: SSC-HSC Result: आज होणार दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा…)
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्जकरणारी व्यक्ती पत्रकारिता, जनसंवाद, व्हिज्युअल कम्युनिकेशन, माहिती, कला, ॲनिमेशन आणि डिझायनिंग, साहित्य आणि सर्जनशील लेखन आदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे तसेच संबंधित व्यक्तीला या क्षेत्रात कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा: १८ ते ३२ वर्षांपर्यंत.
अर्ज शुल्क या भरतीसाठी कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ: https://www.mib.gov.in/
https://mib.gov.in/sites/default/files/ENGLISH.pdf या लिंकवर तुम्हाला भरतीचे सर्व तपशील वाचता येतील तसेच या पीडीएफ मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज देखील करू शकता.
(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळत भरती! या जागांसाठी आजच करा अर्ज..)