भारतीय स्मार्टफोन बाजारात होतेय नव्या खेळाडूची एंट्री; २००एमपी कॅमेऱ्यासह येतोय Honor 90 येणार ‘या’ तारखेला

ऑनरनं घोषणा केली आहे की लवकरच Honor 90 डिवाइस भारतीय बाजारात लाँच केला जाईल. परंतु अजूनही अधिकृतपणे लाँच डेट समोर आली नाही. आता एका ताज्या लीकमधून माहिती समोर आली आहे की हा फोन २१ सप्टेंबरला भारतात लाँच केला जाईल. चला जाणून घेऊया ह्या मोबाइलमध्ये कोणते फीचर्स मिळतील.

Honor 90 लीक लाँच डेट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Honor 90 स्मार्टफोनची लाँच डेट प्रसिद्ध टिप्सटर अभिषेक यादवनं शेअर केली आहे. त्यानुसार आगामी ऑनर ९० मोबाइल २१ सप्टेंबरला भारतात लाँच केला जाऊ शकतो. परंतु ह्या तारखेकडे लीक म्हणून पाहावं लागेल. जोपर्यंत कंपनी अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणं चुकीचं ठरेल.

वाचा: वनप्लस आणि रियलमीला टक्कर देण्यासाठी Vivo सज्ज; V29e 5G ची दणक्यात भारतात एंट्री

Honor 90 चे स्पेसिफिकेशन्स

हा मोबाइल चीनमध्ये सादर झाला आहे त्यामुळे ह्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार Honor 90 मध्ये युजर्सना १.५के रेजोल्यूशनसह ६.७ इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. ह्यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३८४०हर्ट्झ PWM डिमिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Honor 90 मध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेटचा वापर केला आहे. स्मार्टफोन १६जीबी पर्यंत रॅम + ५१२जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. हा मोबाइल चीनमध्ये अँड्रॉइड १३ आधारित मॅजिकयुआय ७.१ वर चालतो.

वाचा: स्मार्टवॉच, इअरबड्स बहिणीला गिफ्ट करायचंय? पण बजेट कमी आहे? हे १५०० रुपयांच्या आतील खास पर्याय

Honor 90 फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायजेशनला सपोर्टसह २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी ५० मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

स्मार्टफोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि ६६ वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.तसेच ह्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय ६, यूएसबी टाइप-सी २.०, ब्लूटूथ ५.२ सारखे फीचर्स मिळतात. ऑनर ९० फोनचं वजन १८३ ग्राम आणि डायमेंशन १६१.९ x ७४.१ x ७.८mm आहेत.

Source link

honorhonor 90honor 90 india launchhonor 90 india priceऑनरऑनर ९०
Comments (0)
Add Comment