इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून एकूण ४९० जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी कंपनीकडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १० सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्यासाठी iocl.com या इंडियल ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तसेच भरती संदर्भातील सर्व तपशील तुम्हाला
https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/4e36b7f0aead4da7a6979f32d23d5252.pdf
या लिंक वर पीडीएफ स्वरूपात वाचता येतील.
तसेच https://iocl.com/apprenticeships या लिंक वर जाऊन तुम्ही थेट अर्ज करू शकता.
(वाचा: MIB Recruitment 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात ‘या’ पदांसाठी भरती.. जाणून घ्या, कसा करायचा अर्ज)
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय १९ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावे.
या भरतीमध्ये ४९० अप्रेंटीस पदे भरली जाणार असून त्यामध्ये टेक्निशिअन, ट्रेड अप्रेंटिस, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, ग्रॅज्युएट अप्रेंटिस असे विभाग आहेत. तर भारतातील तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये कामाचे ठिकाण असेल.
शैक्षणिक पात्रता: अप्रेंटीस साठी शैक्षणिक पात्रता त्या-त्या पदनुसार असून संबधित क्षेत्रातील २ वर्षांचा आयटीआय करणे गरजेचे आहे. तर काही पदांसाठी इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. सविस्तर तपशील भरतीच्या लिंकवर दिले आहेत.
अर्ज कसा कराल..
आयओसीएल अप्रेंटीस भरतीसाठी http://www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्या त्यानंतर त्यातील Apprentice टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला Apply Online चा पर्याय असेल. तिथे जाऊन सर्व अर्ज काळजीपूर्वक वाचा. आवश्यक ते कागदपत्रे जोडून सर्व सत्य माहिती नमूद करा. अर्जाचे शुल्क भरून तो सबमिट करा.
(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळत भरती! या जागांसाठी आजच करा अर्ज..)