Realme GT 5 ची किंमत
Realme GT 5 चे तीन मॉडेल चीनमध्ये लाँच झाले आहेत. फोनच्या बेस मॉडेलमध्ये १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मिळते, ज्याची किंमत २९९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे ३४,००० रुपये आहे. तर १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेजसाठी ३२९९ चायनीज युआन म्हणजे ३७,००० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच २४ जीबी रॅम व १टीबी स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत ३७९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे ४३,००० रुपये ठेवण्यात आली आहे.
वाचा: भारतीय स्मार्टफोन बाजारात होतेय नव्या खेळाडूची एंट्री; २००एमपी कॅमेऱ्यासह येतोय Honor 90 येणार ‘या’ तारखेला
Realme GT 5 स्मार्टफोन चीनमध्ये ४ सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल. डिवाइस युजर्सना Flowing silver illusion mirror (सिल्व्हर) आणि Starry Oasis (ग्रीन) कलर्समध्ये विकत घेता येईल.
Realme GT 5 चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT 5 मध्ये ६.७४ इंचाचा १.५के प्रो एक्सडीआर हाय डायनॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६० पीडब्लूएम डिमिन्ग सपोर्ट आणि एम्बेडेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. चांगल्या स्क्रीन एक्सपीरियंससाठी एक वेगळी एक्स ७ डिस्प्ले चिप देण्यात आली आहे.
Realme GT 5 मोबाइलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो ७४० जीपीयू मिळतो. जोडीला २४जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १टीबी पर्यंत युएफएस ४.० स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ अधरती रियलमी युआय ४.० वर चालतो.
फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी लाइटसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात OIS सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
वाचा: ४जी फोनला पण मिळणार 5G Speed; रिलायन्सनं लाँच केला Jio Air Fiber
फोनसाठी कंपनी दोन बॅटरी मॉडेल घेऊन आली आहे. ज्यात ४,६००mAh बॅटरीसह २४०W फास्ट चार्जिंग मिळते, कंपनीनं दावा केला आहे की हा मॉडेल फक्त साडेनऊ मिनिटांत फुलचार्ज होतो. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये ५,२४०एमएएचची बॅटरी मिळते आणि जोडीला १५० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.