सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रात ११ हजार पदांची भरती

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा

आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील मागील भरतीवेळी झालेला गोंधळ यावेळी टळणार का आणि तरुणांच्या हाताला काम मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

government job newsJob Newsjob recruitmentjob vacancy in maharashtraजॉब बातम्यानोकर भरतीसरकारी नोकर भरतीसरकारी नोकरी
Comments (0)
Add Comment