महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल, गुणपडताळणीसाठी असा करा अर्ज

SSC-HSC Supplementary Exam Results 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज २८ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित यंदाच्या पुरवणी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.

याव्यतिरिक्त, संपूर्ण राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीच्या विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी आणि दहावीच्या विषयाची परीक्षा २ ऑगस्ट तर, २८ जुलै रोजी असलेल्या दहावीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

(वाचा : Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा)

यंदा, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांमध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळात ही परीक्षा घेण्यात आली. यंदाच्या पुरवणी परीक्षेत दहावीचा २९.८६ टक्के तर, बारावीचा ३२.१३ टक्के एवढा निकाल लागला. यात, विज्ञान शाखेचा निकाल ५५.२३ टक्के, कला शाखेचा २०.५९, वाणिज्य शाखेचा १४.६८ टक्के, एमसीव्हीसीच १७.८६ टक्के तर आयटीआयचा ८१.२५ टक्के निकाला लागला आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना :

  • पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून (२९ ऑगस्ट २०२३) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत (कॉपी), पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

  • जुलै-ऑगस्ट २०२३ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

  • छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

(वाचा : तलाठी भरती परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका; स्पर्धा परीक्षा समन्वय समिती करणार या मागण्या)

  • उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

  • फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणारी अंतिम परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

महत्त्वाचे :

  • दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी

दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in

बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी कार्यवाही आणि अर्ज करण्याचा कालावधी :
२९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर

(वाचा : Talathi Bharti Exam 2023: मुंबईतील तलाठी भरती परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ; वेळेपूर्वी प्रवेशद्वार बंद करून नाकारला प्रवेश)

Source link

10th and 12th supplementary exam result10th result12th Resultboard examsmaharashtra board re exam result 2023marksheet correction and verificationssc-hsc re-exam resultsssc-hsc re-exam results 2023ssc-hsc supplementary exam results 2023supplementary exam results 2023
Comments (0)
Add Comment