डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी प्राध्यापक पदाच्या भरतीचा निर्णय घेतला असून त्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या अंदाजे ७३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तेव्हा या भरतीबाबतचे काही खास तपशील पुढीलप्रमाणे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
- प्रोफेसर – ३
- असोसिएट प्रोफेसर – २०
- असिस्टंट प्रोफेसर – ५०
एकूण रिक्त जागा – ७३
(वाचा: MIB Recruitment 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात ‘या’ पदांसाठी भरती.. जाणून घ्या, कसा करायचा अर्ज)
वरील पदांसाठी मिळणारे वेतन :
- प्रोफेसर : १ लाख ४४ हजार २०० रुपये ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत.
- असोसिएट प्रोफेसर : १ लाख ३१ हजार ४०० रुपये ते २ लाख १७ हजार १०० रुपयांपर्यंत.
- असिस्टंट प्रोफेसर : ५७ हजार ७०० रुपये ते १ लाख ८२ हजार १०० रुपयांपर्यंत.
शैक्षणिक पात्रता :
- प्रोफेसर: पीएच.डी. पदवी
- असोसिएट प्रोफेसर: पदव्युत्तर पदवी
- असिस्टंट प्रोफेसर: पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण : संभाजी नगर/औरंगाबाद
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
भरतीसाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट : bamu.ac.in
या भरतीचे सर्व तपशील तुम्हाला https://drive.google.com/file/d/14xeUeRdb8ii2pz4wx5Ta7e1D1mX0l4Kw/view या लिंकवर वाचता येतील.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२३ आहे तर अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ ही आहे.
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद- ४३१००४
(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळत भरती! ‘या’ जागांसाठी आजच करा अर्ज..)