एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये मेगाभरती! वाचा नोकरीचे सर्व तपशील..

आपणही विमान सेवेत काम करावे अशी अनेकांची इच्छा असते, अनेकजण अशा भरती आणि परीक्षा प्रक्रियांसाठी अर्ज करत असतात. तुम्हालाही विमान सेवेचा भाग व्हायचे असेल तर एक सुवर्णसंधी आहे. ‘एएआय’ म्हणजेच एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(AAI), नवी दिल्ली यांनी महाभरती जाहीर केली आहे. नुकतीच या भरतीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, सिनिअर असिस्टंट या पदांच्या एकूण ३०० हुन अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ४ सप्टेंबर हि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्जासाठी ‘एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे अधिकृत संकेतस्थळ – https://www.aai.aero/en

https://www.aai.aero/en/careers/recruitment या लिंक वर जाऊन तुम्ही प्रत्येक पदासमोरील डाऊनलोड पर्यायावर क्लिक त्याची तपशीलवार माहिती वाचू शकता.

‘एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या आणि पात्रता..

ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) – ९ पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (कॉमन कॅडर) – २३७ पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

(वाचा: BAMU Aurangabad Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाभरती! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..)

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फिनान्स) – ६६ पदे
पात्रता – बी.कॉम. आणि एम.बी.ए. (फिनान्स)/ ICWA/CA.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (फायर सव्‍‌र्हिस) – ३ पदे
पात्रता – बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनीअरींग) अर्ज पडताळणीच्या वेळी LMV ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे अनिवार्य आहे.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (लॉ) – १८ पदे
पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी.

सिनियर असिस्टंट (अकाऊंट्स) – ९ पदे
पात्रता – पदवी उत्तीर्ण शक्यतो बी.कॉम. आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

भरतीसाठीची एकूण पदे – ३४२

संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या पदवीचे अंतिम वर्षांचे उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिये पूर्ण झाल्यानंतर अर्ज पडताळणीच्या वेळी त्यासंदर्भातील पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :

ज्युनियर असिस्टंट / सिनियर असिस्टंट – ३० वर्षेपर्यंत,
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह : २७ वर्षेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेत इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षे सूट देण्यात आली आहे.
विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही अशा महिलांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षेपर्यंत

निवड पद्धती :

भरती प्रक्रियेत अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार अर्ज पडताळणी/ कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट/ शारीरिक मापदंड आणि शारीरिक क्षमता चाचणी, ड्रायव्हिंग टेस्टसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यानंतर अंतिन निवड होईल.

या भरतीसाठी उमेदवारांना १००० रुपये अर्जाचे शुल्क आकारण्यात आले आहे. अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ अअक मध्ये अ‍ॅप्रेंटिसशिप केलेले उमेदवार यांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.

(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळत भरती! ‘या’ जागांसाठी आजच करा अर्ज..)

Source link

aai recruitmentAAI Recruitment 2023aai recruitment 2023 apply onlineairport authority of india recruitmentAirports Authority of IndiaCareer NewsGovernment jobjob for graduatesJob News
Comments (0)
Add Comment