स्वस्वदेशी ६जी
अंबानींनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये स्वस्वदेशी टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की जिओ 6G पूर्णपणे मेड इन इंडिया असेल. त्यांनी सांगितलं आहे की जिओ आपली मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी जगातील इतर मार्केट्समध्ये देखील निर्यात करेल आणि ह्या क्षेत्रात विश्वाचं नेतृत्व करेल.
वाचा: Moto G54 5G चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, पाहा खासियत
जिओ ५जी टेक्नॉलॉजी
Jio ची ५जी टेक्नॉलॉजी एक स्टॅन्डअलोन नेटवर्क आहे. ह्यात इनोवेटिव टेक्नॉलॉजी जसे की आर्किटेक्चर, कॅरियर अॅग्रीगेशन, नेटवर्क आणि एआयचा वापर केला गेला आहे. जिओनं ह्याआधीच दावा केला आहे की ते भारतात सर्वात स्वस्त Jio प्लॅन सादर करेल. परंतु रिलायन्स एजीएम मध्ये ५जी रिचार्ज प्लॅनची घोषणा केली नाही.
अंबानींनी सांगितलं की Jio नं भारतात सर्वात वेगवान ५जी रोलआउट करून रेकॉर्ड बनवला आहे. ५जी नेटवर्क भारतात १ ऑक्टोबर २०२२ ला लाँच करण्यात आलं होतं. ह्या रोलआउट नंतर ९ महिन्यांनी Jio 5G नं देशातील ९६ टक्के शहरांमध्ये ५जी नेटवर्क रोलआउट केलं आहे.
वाचा: ४जी फोनला पण मिळणार 5G Speed; रिलायन्सनं लाँच केला Jio Air Fiber
जिओ घेऊन येईल चॅटजीपीटी सारखं टूल
मुकेश अंबानींनी म्हटलं आहे की Jio भारतीय युजर्ससाठी ChatGPT सारखं स्वस्वदेशी AI टूल घेऊन येईल. जिओ प्रत्येकासाठी एआय टूल उपलब्ध करवून देण्यावर काम करेल.