अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्ट बनायचे आहे..? भविष्यात आहेत अनेक संधी उपलब्ध

Career in Marine Archaeologist: Marine Archaeology ही पुरातत्वशास्त्राची एक शाखा आहे. मरीन आर्किऑलॉजिस्ट म्हणून काम करणारी व्यक्ति समुद्र, नद्या, तलाव आणि पाण्याच्या इतर स्त्रोतांमध्ये सापडलेल्या अवशेषांमधून किंवा इतर सामग्रीद्वारे मानवी जीवनाच्या आणि भूतकाळातील पुरातन गोष्टींची माहिती मिळवून त्यामागचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतात. सागरी पुरातत्वशास्त्रज्ञांना अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्ट देखील म्हणतात. यामध्ये आपल्या देशातील किंवा जगातील समुद्र, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांच्या खाली गाडलेले अवशेष, इमारती किंवा अवशेष यांचा अभ्यास केला जातो,सागरी पुरातत्वशास्त्रात आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामागील कारण म्हणजे व्यावसायिकांची बहुतांश कामे पाण्याच्या खाली केली जातात.

अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्ट बनण्यासाठी ही पात्रता :

  • विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून विज्ञान शाखेतील बारावी किंवा समक्षक शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • विद्यार्थ्यांना इतिहास विषयाची आवड आणि ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • या क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

हे अभ्यासक्रम उपलब्ध :

पदव्युत्तर अभ्यासक्रम :
सागरी पुरातत्व क्षेत्रात शिक्षण घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये एमए – पुरातत्वशास्त्र, एमए – प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्व आणि एमएससी – पुरातत्वशास्त्र समाविष्ट आहे.

डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी :
त्याचबरोबर या क्षेत्रात डॉक्टरेट अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र हा एमफिलमध्ये चांगला पर्याय आहे आणि पीएचडीमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र हा एक चांगला पर्याय आहे.

मिळतो एवढा पगार :
या क्षेत्रात करिअर सुरू केल्यावर सरासरी ३ ते ४ लाखांचे पॅकेज मिळते आणि काही वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर उच्च पात्रता उत्तीर्ण झाल्यानंतर ५ ते ८ लाखांचे पॅकेजही तुम्हाला मिळू शकते.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)

Source link

Archaeology StudiesCareer in Marine ArchaeologyCareer Opportunities As ArchaeologistMarine ArchaeologyTitanic Archaeologist
Comments (0)
Add Comment