आयकर विभागात काम करायचे आहे? इनकम टॅक्समध्ये ‘यंग प्रोफेशनल’ पदांच्या भरतीची घोषणा

Income Tax Department Bharti 2023: पदवीधर असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाच्या आयकर विभागाने तरुण व्यावसायिक पदांच्या भरतीसाठीची जाहीरात प्रसिद्ध केली असून, याभरती अंतर्गत एकूण १२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर भरती ही एक वर्षाच्या कंत्राटी तत्वावर (Contract Basis) असून, या जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, नोकरीचे ठिकाण, महत्वाची संकेतस्थळ, आणि अर्जाची शेवटची तारीख याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

पदाचे नाव : तरुण व्यावसायिक / यंग प्रोफेशनल (Young Professionals)

एकूण रिक्त पदे : १२ जागा

नोकरीचे ठिकाण : भारतातील कोणत्याही राज्यात

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर किंवा समकक्ष.

(वाचा : तलाठी भरती परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका; स्पर्धा परीक्षा समन्वय समिती करणार या मागण्या)

वयोमार्यादा :

आयकर विभागामधील या जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय मूळ जाहीरातीमधील तारखेनुसार ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्जाविषयी महत्त्वाचे :

१. आयकर विभागातील यंग प्रोफेशनल या जागेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
२. सदर जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १८ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे.
३. शिवाय, अर्जसोबत आवश्यक कागदपत्र जोणे अनिवार्य असणार आहे.
४. आयकर विभागातील ही भरती कंत्राटी तत्त्वावर (Contract Basis) असून, एक वर्षांनंतर काम पाहून कंत्राट वाढवण्यात येईल.

(वाचा : MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखातीमधून पार पडणार निवड प्रक्रिया)

महत्त्वाचे :

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिकृत वेबसाइटवर नोकरीचा सविस्तर तपशील पाहणे गरजेचे आहे.
  • १८ सप्टेंबर २०२३ ही अर्जाची करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी आयकर विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात वाचने आवश्यक आहे.
  • ऑफलाइन अर्ज करताना, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
  • अर्ज आणि कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

असा करा अर्ज :

आयकर विभाग भरती २०२३ साठी ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा, अपूर्ण माहिती असणारे अर्ज नाकारले जातील.

आयकर विभागामधील या जागांविषयीची मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड भरती अंतर्गत इंजिनीयर्सना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदावर भरती सुरु)

Source link

income taxincome tax department contract jobincome tax department recruitmentincome tax department recruitment 2023job openings for graduatesjob openings in income tax departmentpan indiayoung professionals
Comments (0)
Add Comment