‘एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ मध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदासाठी भरती! आजच करा अर्ज..

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल आणि देशाच्या विमान विकास अभिकरणात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ (ADA), बंगळूरु यांनी भरतीसाठीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदाच्या १०० जागा भरण्यात येणार आहेत.

या भरतीद्वारे विविध शाखेतील ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ची निवड केली जाणार आहे. इंजिनियरिंगची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेचे स्वरूप वॉक-इन-इंटरह्यू आणि लेखी परीक्षा अशा पद्धतीचे असेल. हि पदे केवळ दोन वर्षांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत, पुढे तो ४ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

या भरती प्रक्रियेतील ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदाचे विभाग, पदसंख्या आणि परीक्षेचे तपशील:

मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनीअरींग/ मेटॅलर्जी/ मटेरियल सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरींग – २३ पदे.
इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ४ सप्टेंबर २०२३.

एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस इंजिनीअरींग – २ पदे.
इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ७ सप्टेंबर २०२३.

सिव्हील इंजिनीअरींग – २ पदे.
इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ७ सप्टेंबर २०२३.

कॉम्प्युटर सायन्स/ इन्फो. टेक्नॉलॉजी/ इन्फो. सायन्स – २५ पदे.
इंटरह्यू/लेखी परीक्षेची तारीख – ११ सप्टेंबर २०२३.

इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन – ४८ पदे.
इंटरह्यू/ लेखी परीक्षेची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.

(वाचा: BAMU Aurangabad Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाभरती! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..)

शैक्षणिक पात्रता:

वरील सर्व पदांसाठी संबंधित विषयातील ६० टक्के गुणांसह B.E. किंवा B.Tech. आणि व्हॅलिड GATE स्कोअर असायला हवा. किंवा ६० टक्के गुणांसह M.E. किंवा M.Tech पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा ६० टक्के गुणांसह B.E. किंवा B.Tech. आणि दोन वर्षे कामाचा अनुभव हवा.

कॉम्प्युटर सायन्स/ इन्फो. टेक्नॉलॉजी/ इन्फो. सायन्स या विभागातील पदासाठी ६० टक्के गुणांसह B. Sc. U M. Sc. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इन्फो सायन्स) उत्तीर्ण आणि दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव हवा. किंवा GATE/ UGC- CSIR यांची JRF/ लेक्चररशिपसाठीची पात्रता परीक्षा NET उत्तीर्ण असावी.
या व्यतिरिक्त आलेल्या सविस्तर पात्रता भरतीच्या अधिसूचनेत वाचता येतील.

वयोमर्यादा: २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षे, अजा/ अज – ३३ वर्षे).

निवड पद्धती:

सर्व उमेदवारांची आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. जास्त उमेदवार आले तर मुलाखतीचे सत्र दुसऱ्या दिवशीपर्यंत चालू शकते.

‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’च्या https://www.ada.gov.in या लिंकवर जाऊन रिक्रूटमेंट पर्यायावर अर्ज उपलब्ध होईल. हा अर्ज टाईप करून त्या अर्जाच्या प्रतिसह सर्व आवश्यक ते डॉक्युमेंट्स घेऊन मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

तर भरती संदर्भातले सर्व तपशील https://www.ada.gov.in/currentdocs/ADV-122%20Walk%20In%20Interview.pdf या लिंक वर वाचता येतील.

मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ – एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी कॅम्पस – एस, सुरंजनदास मार्ग, न्यू ठिप्पासंद्रा पोस्ट, बंगाल.

वेळ – सकाळी ८.३० ते ११.०० वाजे दरम्यान रजिस्ट्रेशन आणि कागदपत्र पडताळणीसाठी हजर रहावे. सकाळी ११.०० वाजेनंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

भरती संदर्भात काही प्रश्न असल्यास admin- hr. ada@gov. in या ई-मेल आयडी द्वारे संपर्क साधावा.

(वाचा: NSCL Recruitment 2023: राष्ट्रीय बियाणे महामंडळत भरती! ‘या’ जागांसाठी आजच करा अर्ज..)

Source link

ADA RECRUITMENTADA RECRUITMENT FOR PROJECT ASSISTANTaeronautical development agencyAeronautical Development Agency RecruitmentCareer Newsgovernment jobsjob for engineersjob in aeronautical fieldJob News
Comments (0)
Add Comment