हायलाइट्स:
- नांदेडमधील मूक आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल.
- खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला संताप.
- गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!
कोल्हापूर: गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का गुन्हा दाखल करताय?, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी नांदेड येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आणि सरकारवर निशाणा साधला. ( Sambhaji Raje On Nanded Muk Morcha )
वाचा: तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल!; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने तरुणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर येथे आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर सरकारने मागण्यांच्या पूर्ततेसाठी महिन्याची मुदत मागितली होती. ती मुदत संपल्यानंतरही मागण्याबाबत निर्णय न घेतल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले.
वाचा: ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; जन आशीर्वाद यात्रेवर मोठी कारवाई
नांदेड येथे शुक्रवारी मूक आंदोलन झाले. यावेळी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रया व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर गुन्हा का? असा सवाल त्यांनी केला आहे. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वाचा:‘ती’ ऑडिओ क्लिप: नीलेश लंके भेटल्यानंतर अण्णांनी घेतली ‘ही’ भूमिका