मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील (स्वायत्त वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत होती. आता विद्यापीठातर्फे मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना गुरुवार, ३१ ऑगस्टपर्यंत या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. मात्र, ही अंतिम प्रवेशवाढ असून, दिलेल्या तारखेनंतर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाथी अर्ज करता येणार नाही.
(वाचा : आता Li-Ion Battery Recycle करून वापरात आणणे सहज शक्य; मुंबई विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा जगाला होणार फायदा)
ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश घेता आला नाही अथवा ज्यांची प्रवेशासाठीची प्रक्रिया अर्धवट राहिली अशा विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. मात्र ही अखेरची संधी असल्याने विद्यार्थ्यांनी यासाठी वेळेत आपले प्रवेश पूर्ण करावेत, असे आवाहन आयडॉलकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर स्तरावरील ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ , ‘मानव्यविज्ञान’, ‘आंतरविद्याशाखीय’ आणि ‘वाणिज्य’ विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
(वाचा : आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची संस्थेला तब्बल १८.६ दशलक्ष डॉलर्सची देणगी; ग्रीन एनर्जी आणि अद्ययावत संशोधन केंद्राची उभारणी होणार)
विद्यार्थ्यांना आयडॉलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) च्या पदव्युत्तर (पीजी/ PG) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.