Moto G54 5G चे स्पेसिफिकेशन्स
मोटो जी५४ ५जी फोन २०:९ अॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो २४०० x १०८० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
वाचा: अजूनही खरेदी केलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? २ हजारांच्या बजेटमध्ये ऑर्डर करा Wireless Earbuds
Moto G54 5G फोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी ७०२० ऑक्टाकोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी बीएक्सएम-८-२५६ जीपीयू आहे. जोडीला १२जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी पर्यंत स्टोरेज आहे. ही स्टोरेज १टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. मोटो जी५४ ५जी फोन अँड्रॉइड १३ ओएससह लाँच करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा ओआयएस असेलेला सेन्सर देण्यात आला आहे जोडीला ८ मेगापिक्सल मॅक्रो+डेप्थ सेन्सर मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मोटो जी५४ ५जी मध्ये ६,०००एमएएचची बॅटरी आहे.
अन्य फीचर्स पाहता हा Moto G54 5G फोन १४ ५जी बँड्सना सपोर्ट करतो. तसेच आयपी५२ रेटिंग असलेला हा फोन ३.५mm जॅक, एफएम रेडियो आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. हा फोन मिंट ग्रीन आणि मिडनाइट ब्लू आणि पर्ल ब्लु कलरमध्ये विकत घेता येईल.
वाचा: Mukesh Ambani यांची मोठी घोषणा; Jio जगाला दाखवणार 6G ची ताकद, जाणून घ्या कधी होणार लाँच
मोटोरोला मोटो जी५४ ५जी फोनची किंमत मात्र सांगितली नाही. वेबसाइटनुसार हा स्मार्टफोन ८जीबी रॅम आणि १२जीबी रॅम मॉडेल्ससह विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु कधीपासून ही विक्री सुरु होईल ते मात्र समजलं नाही.