Rakshabandhan 2023: भावाच्या उज्वल भविष्यासाठी राशीनुसार बांधा राखी, पाहा कोणत्या राशीसाठी कोणती राखी उत्तम
राखी बांधण्याचा मुहूर्त
बुधवार ३० ऑगस्टला पौर्णिमा सुरू होत आहे. रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ४८ मिनिटापासून सुरू होत असून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील. पण, ३० ऑगस्टला भद्राकाळ रात्री ९ वाजता असेल. भद्राकाळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. पण, तुम्ही भाद्र पूंछमध्ये म्हणजे प्रदोष काळात राखी बांधू शकता. ३० ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते ६ वाजून ३१ मिनिटे या वेळेत राखी बांधता येईल. यानंतर रात्री ९ वाजल्यापासून ३१ तारखेला सकाळी ७ वाजून ०६ मिनिटापर्यंत राखी बांधता येईल.
भद्राकाळात राखी का बांधत नाही
लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती. रावणाच्या सर्वनाशाला हेदेखील एक कारण होते, अशी मान्यता आहे, त्यामुळे भद्रा काळात विशेष काळजी घ्यावी. राहूकाळ आणि भद्राकाळात शुभ कार्य करू नये.
Raksha Bandhan Quotes in Marathi: भाऊ बहिणीचं अतुट नातं जपण्यासाठी रक्षाबंधन साजरा करूया, ‘या’ शुभेच्छा देऊया
राखी बांधताना ३ गाठी का बांधतात
रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना ३ गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी, कारण या ३ गाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही संबोधतात. यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, दुसरी गाठ सुख, समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे. तसेच काळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे.
September 2023 Festival List: लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासह या महिन्यात ‘हे’ मुख्य सण, पाहा तारीख आणि महत्व