आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० ऑगस्ट २०२३: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद ८, शक सवंत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल चतुर्दशी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १४, सफर १२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजोपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी पूर्वाह्न १० वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ.

धनिष्ठा नक्षत्र रात्री ८ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ. अतिगण्ड योग रात्री ९ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. वणिज करण सकाळी १० वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून १९ मिनिटापर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५४,
चंद्रोदय: सायं. ६-४०,
चंद्रास्त: पहाटे ५-१९,
पूर्ण भरती: सकाळी ११-२६ पाण्याची उंची ४.५९ मीटर, रात्री ११-३४ पाण्याची उंची ४.२६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ०.४१ मीटर, सायं. ५-३० पाण्याची उंची १.२० मीटर.

दिनविशेष: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे ते ७ वाजून ८ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५८ मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. भद्रा काळ १० वाजून ५८ मिनिटे ते ९ वाजून १ मिनिटापर्यंत. पंचक सकाळी १० वाजून १९ मिनिटापर्यंत ते दुसऱ्या दिवशी ३१ तारीख ५ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

narali purnimapanchang in marathirakshabandhantoday panchang 30 august 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२रक्षाबंधन
Comments (0)
Add Comment