‘एमइएससीओ, पुणे’ म्हणजेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे यांनी ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिकृत जाहीरात देखील संस्थेने प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत चालकांची ६० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. थेट मुलाखत प्रक्रियेद्वारे ही भरती होणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट येथे ६० वाहन चालक पदांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातुन नेमणूक करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत १ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.
(वाचा: UPSC Recruitment 2023: स्पर्धा परीक्षा देणार्यांनो लक्ष द्या.. ‘युपीएससी’ द्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती!)
यासाठी पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.
– मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.
वेतन:
निवडलेल्या उमेदवारांना महिना ३१,३१४ इतका पगार मिळणार आहे. तर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व मॅच्युटीचे फायदे देखील मिळणार आहेत
पात्रता:
या पदासाठी संस्थेने कोणतीही शिक्षणाची अट नमूद केलेली नाही. परंतु ही भारती केवळ माजी सैनिक आणि त्यांच्या मुलांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांना हलकी आणि जड वाहने चालवण्याचा अनुभव हवा तसेच त्यासाठीचे सर्व अधिकृत परवाने त्यांच्याकडे हवे. विशेष म्हणजे तो पिंपरी परिसरापासून १५ ते २० किलोमीटरच्या क्षेत्रात राहणारा असावा आणि त्याची जवळची आणि दूरची दृष्टी योग्य असावी.
https://drive.google.com/file/d/1AlJeQTiuHS6itkVrYoSjAaeKl_mAdR2u/view या लिंकवर तुम्हाला भरतीची जाहिरात पाहता येईल.
नोकरीचे ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: १ सप्टेंबर २०२३ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत
अधिकृत वेबसाईट: http://www.mescoltd.co.in
(वाचा: BAMU Aurangabad Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाभरती! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..)