अॅप्पलचे सीनियर व्हाइस प्रेजिडेंट (मार्केटिंग) ग्रेग जोस्विक ह्यांनी X (Twitter) वर पोस्ट करून Apple Event ची माहिती दिली आहे. तसेच कंपनीच्या वेबसाइटवर देखील इव्हेंटची मायक्रो साइट लाइव्ह करण्यात आली आहे. त्यावर सांगण्यात आलं आहे की १२ सप्टेंबरला इव्हेंटचं आयोजन केलं जाईल, ज्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात १०:३० वाजता होईल. हा इव्हेंट apple.com, Apple TV आणि कंपनीच्या युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघता येईल.
वाचा: इंस्टाग्रामवर कोणीतरी ब्लॉक केलंय का? असं जाणून घ्या कोणी तुम्हाला Instagram वर ब्लॉक केलंय
अॅप्पल इव्हेंटच्या डेट आणि टाइम व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यामुळे कोणते प्रोडक्ट लाँच होतील ते समजलं नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता १२ सप्टेंबरला होणाऱ्या अॅप्पल इव्हेंटमध्ये आयफोन १५ सीरीज सादर केली जाईल. कारण नवीन आयफोन सीरीज दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सादर केली जाते.
अॅप्पल इव्हेंट २०२३ मधून कोणते प्रोडक्ट होणार लाँच
रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळी देखील अॅप्पल नवीन आयफोन सीरीजमध्ये चार फोन सादर करेल. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की यावेळी कंपनी आयफोनच्या नावात बदल करू शकते. त्यामुळे आयफोनचा टॉप मॉडेल Pro Max ऐवजी Ultra नावानं सादर केला जाऊ शकतो. तसेच नवीन आयफोनमध्ये सर्वात मोठा बदल चार्जिंग पोर्टमध्ये पाहायला मिळू शकतो. आयफोन १५ सीरीज USB-C चार्जिंग पोर्टसह येऊ शकते.
वाचा: एकच नंबर! 6000mAh Battery आणि 12GB RAM; Moto G54 5G फोनची भारतात एंट्री
कंपनी इव्हेंटमध्ये नवीन अॅप्पल वॉच मॉडेलची घोषणा देखील करू शकते. ह्यात हाय एन्ड अॅप्पल वॉच अल्ट्राचा अपडेटेड व्हर्जन देखील असू शकतो. सप्टेंबर इव्हेंटमध्ये Apple साधारणतः iPhone साठी iOS चं नवीन व्हर्जन देखील रिलीज करते. त्यामुळे यंदा iOS 17 येण्याची शक्यात आहे. ज्यात सुधारित कॉलर आयडी मिळेल, जयला कॉन्टॅक्ट पोस्टर म्हटलं जातं. त्याचबरोबर सुधारित ऑटोकरेक्ट आणि एक नवीन जर्नलिंग अॅपचा देखील समावेश आहे.