महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदराच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे. या संस्थेत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. आता या संस्थेत ‘गट अ’च्या बंदर अधिकारी’ पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी बोर्डाने भरतीची अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून त्यासंदर्भात एक ऑनलाईन माध्यमातून एक ई-मेल देखील करायचा आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि नोकरीचे सर्व तपशील जाणून घेऊया..
(वाचा: BAMU Aurangabad Recruitment 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाभरती! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..)
महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई भरती २०२३ अंतर्गत नियुक्त केले जाणारे पद आणि पदसंख्या:
गट-अ बंदर अधिकारी – पदसंख्या १
शैक्षणिक पात्रता:
भारत सरकारने किंवा D.G शिपिंगद्वारे मान्यताप्राप्त मास्टर (परदेशी जाणारे) योग्यतेचे प्रमाणपत्र. डेक ऑफिसर म्हणून पाच वर्षांचा अनुभव ज्यापैकी एक वर्ष परदेशी जाणाऱ्या व्यापारी शिपवर मास्टर म्हणून असणे आवश्यक.
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: ४८ वर्षांपर्यंत.
वेतन: गट-अ बंदर अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला महिना १ लाख ३३ हजार ४०० रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.
भरती संदर्भात माहिती घेण्यासाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट: https://mahammb.maharashtra.gov.in/
भरती संदर्भातील जाहिरात वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1_5noDXSrdD2IKICbWeXilasfOu_X8SEu/view?pli=1 या लिंकवर भेट द्या.
अर्जाची पद्धती: ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी: essttceommb@gmail.com
प्रत्यक्ष अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२३
(वाचा: UPSC Recruitment 2023: स्पर्धा परीक्षा देणार्यांनो लक्ष द्या.. ‘युपीएससी’ द्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती!)