‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय…

स्पर्धा परीक्षा हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आज लाखो तरुण-तरुणी या परीक्षेतून अधिकारी पदपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहत असतात आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. याच परीक्षेचा एक महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच ‘एमपीएससी’ परीक्षा. राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी वर्गाची निवड करण्यासाठी घेतल्या जाणार्‍या या परीक्षेकडे लाखो उमेदवार डोळे लावून असतात. या परीक्षेबाबत नुकताच एक महत्वाचा निर्णय समोर आला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील पदसंख्येसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला, तो म्हणजे प्रस्तुत परीक्षेमधून गट ब आणि गट क साठी नियुक्त केल्या जाणार्‍या पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. आता एकूण ८१७० ऐवजी ८२५६ पदांची भरती करण्यात येणार आहे..

(वाचा: RRC Central Railway Apprentice Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती! आजच करा अर्ज..)

‘एमपीएससी’मार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षे मधून केवळ ८१७० पदांची भरती करण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्येही उल्लेख केला होता. तसेच दिनांक २८ जून, २०२३, ०७ जुलै, २०२३ व दिनांक ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकातही तसे नमूद करण्यात आले होते.

परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. दिनांक ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर दिसून आले की, शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्राद्वारे अनुक्रमे लिपिक- टंकलेखक व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता सुधारित पदसंख्येची मागणीपत्रे प्राप्त झाली होती. त्यानुसार आता या पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील ८१७० ऐवजी आता एकूण ८२५६ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परिक्षार्थींसाठी ही आनंदाची बातमी आहे.

(वाचा: Mumbai University: सुरेश वाडकर यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव अंतिम फेरीचे उद्घाटन..)

Source link

Career Newseducation newsgovernment jobsJob Newsmpsc increase postsMPSC Jobmpsc newsMPSC RecruitmentMPSC Vacancy
Comments (0)
Add Comment