महाआरोग्य विभाग भारती २०२३ ची अधिसूचना गट क आणि गट ड संवर्गासाठी जाहीर करण्यात आली असून, या भरतीअंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट आणि ड्रायव्हर आणि इतर पदांचा समावेश आहे. तर, गट ड संवर्गातील हवालदार, सफाई कामगार आणि इतर अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर भरती प्रक्रिया ही संपूर्णतः ऑनलाइन माध्यमातून पार पडणार असून, २९ ऑगस्ट २०२३ पासून या भरतीप्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. आरोग्य विभाग नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. आरोग्य विभागातील या महाभरतीच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊया.
पदभरतीचा तपशील :
आरोग्य विभाग ‘गट क’ : ६९३९ जागा
आरोग्य विभाग ‘गट ड’ : ४०१० जागा
एकूण रिक्त जागा : १० हजार ९५९
आरोग्य विभाग ‘गट क’ :
मुंबई आरोग्य सेवा मंडळ :८०४
पुणे आरोग्य सेवा मंडळ : १६७१
नाशिक आरोग्य सेवा मंडळ : १०३१
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ : ६३९
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ : ४७०
लातूर आरोग्य सेवा मंडळ : ४२८
अकोला आरोग्य सेवा मंडळ : ८०६
नागपूर आरोग्य सेवा मंडळ : १०९०
आरोग्य विभाग ‘गट क’ वर्गातील एकूण रिक्त जागा : ६९३९ जागा
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
परिक्षा शुल्क :
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार असून सदर परिक्षा शुल्क हे ना-परतावा राहील.
उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये (अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, परीक्षा रद्द होणे इत्यादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही.
उमेदवाराने एकापेक्षा अनेक पदांकरिता अर्ज केले असल्यास प्रत्येक पदाकरीता वेगळे परिक्षा शुल्क आकारले जाईल.
१. अमागास : १,०००/-
२. मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस : ९००/-
३. माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही
(अधिक महितीसाठी मूळ जाहीरात पाहा)
अशी आहे निवड प्रक्रिया :
- गट क. पदांसाठी
एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुणांची याप्रमाणे २०० गुणांची परीक्षा राहील
2. लिपिक वर्गीय पदांसाठी
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा असेल
3. तांत्रिक संवर्गातील पदांसाठी
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असेल
4. वाहन चालक पदाकरिता
मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहील व पदसंधर्भात ४० प्रश्न असेल
5. गट ड पदांकरिता
एकूण ५० प्रश्न प्रश्न १०० मार्कंसाठी राहील
परीक्षेसाठी वेळ २ तास असेल
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर (performance) केली जाईल
गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील.
आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्र :
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा १० तत्सम शैक्षणिक अर्हता)
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- अधिवास प्रमाणपात्र
- मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०२३
पदभरतीचा मूळ तपशील आणि जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर पदभरती मधील विविध जागांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.