अँड्रॉइडचा बादशहा येतोय बाजारात; Google Pixel 8 सीरीजची लाँच डेट कंपनीनं सांगितली

Google Pixel 8 Series ची लाँच डेट समोर आली आहे. गुगलनं Instagram Threads आणि X (Twitter) हँडलवरून आगामी पिक्सल ८ सीरीजची लाँच डेट सांगितली आहे. Apple Event नंतर हा टेक विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट असेल ज्याच्या माध्यमातून कंपनी आपले प्रीमियम डिवाइस सादर करू शकते. गुगल पिक्सल ८ सीरीजचा लाँच इव्हेंट अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला जाईल.

आयफोनला ट्रॉल करत केली घोषणा

Google नं Pixel 8 Series च्या लाँच डेटच्या पोस्टमध्ये देखील Apple iPhone च्या कॅमेऱ्याला ट्रॉल केलं आहे. Googlepixels च्या Instagram Threads हँडलवर एक शॉर्ट व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यात iPhone आणि Pixel डिवाइसेजचे कॅमेऱ्यांची तुलना करण्यात आली आहे. ह्या व्हिडीओमध्ये Pixel आणि iPhone चे कॅमेरा मॉड्यूल काकडीच्या तुकड्याने झाकलेले आहेत. व्हिडीओमधून गुगल पिक्सल डिवाइसमधील AI फीचर कंफर्म झालं आहे.
वाचा: Google झाली मोठी चूक; लाँचपूर्वीच कंपनीच्या वेबसाईटवर दिसला Pixel 8 Pro

Google I/O 2023 इव्हेंटमधून सादर झालेले Pixel Fold आणि Pixel Tablet आता अमेरिकन बाजारात उपलब्ध आहेत. तर गुगलच्या आगामी इव्हेंटमधून Pixel 8, Pixel 8 Pro सह Pixel Buds A सीरीज देखील सादर केली जाऊ शकतो. परंतु गुगलच्या थ्रेड पोस्टमधून ह्या डिवाइसची माहिती समोर आली नाही.

Pixel 8 Series चे संभाव्य फीचर्स

Pixel 8 सीरीजमध्ये Tensor 3 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो, हा कंपनीचा स्वतःच प्रोसेसर आहे जो सॅमसंगनं बनवला आहे. ह्या सीरीजचे दोन्ही फोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेल्या ओएलईडी डिस्प्ले पॅनलसह येतील. त्याचबरोबर १२जीबी रॅम व २५६जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. गुगलची ही सीरीज ४८ मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह येऊ शकते. तसेच यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग आणि अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते.

वाचा: तुम्ही WhatsApp स्टेटस पाहिलं हे कोणालाच कळणार नाही, ट्राय करा ह्या ३ ट्रिक्स

गुगलच्या ह्या सीरीजमध्ये अनेक एआय फीचर्सचा वापर केला जाऊ शकतो. काही लिक्सनुसार फोनमध्ये ऑडिओ इरेजर सारख्या एआय फिचरचा समावेश असू शकतो. तसेच कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी देखील सादर करू शकते. गुगलच्या आगामी इव्हेंटमधून पिक्सल ८ सीरिजसह अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टम देखील सर्व अँड्रॉइडसाठी सादर केली जाईल.

Source link

googlegoogle pixel 8google pixel 8 india launchgoogle pixel 8 progoogle pixel 8 series
Comments (0)
Add Comment