IANS च्या रिपोर्टनुसार, मुख्य शहरातील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अनेक बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स आले.
घोटाळे करणारा स्वत:ला एका मोठ्या कंपनीचा अधिकारी सांगत होता आणि कामाशी संबंधित व्यक्तीशी बोलण्याची परवानगी मागतो. स्कॅमर्स लोकांना मेसेज देखील पाठवत आहेत ज्यात असे लिहिले आहे – ‘तुम्ही मोकळे होताच मला कॉल करा..’ अहवालात असे म्हटले आहे की बनावट कॉल अटलांटा, जॉर्जिया आणि +1 (404) कोडसह अमेरिकन नंबरवरून होते. शिकागो, इलिनॉयचा +1 (404) कोड +1 (773) अशा नंबरवरुन कॉल येत असतात.
सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?
गेल्या महिन्यात भारतातील अनेक लोकांना परदेशी नंबरवरून अनेक कॉल आणि एसएमएस आले होते. यानंतर व्हॉट्सअॅपने कारवाई करत असे सर्व नंबर ब्लॉक करण्यास सुरुवात केली. घोटाळेबाज बनावट कॉलर आणि कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना फसवतात आणि नंतर त्यांचे पैसे आणि वैयक्तिक माहिती चोरतात. तुमच्यासोबत हे सर्व घडू नये म्हणून, नेहमी आधी समोरच्या व्यक्तीची पडताळणी करा आणि त्यानंतरच कोणतेही तपशील शेअर करा. WhatsApp च्या सर्व गोपनीयता सेटिंग्ज जसे की 2FA, अनोळखी नंबरवरून सायलेंट कॉल इत्यादी चालू ठेवा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल. जर तुम्हाला परदेशी नंबरवरून कॉल आला तर तो उचलू नका किंवा मेसेजला उत्तर देऊ नका किंवा लिंकवर क्लिक करू नका. तत्काळ तक्रार करा आणि अशा क्रमांकांना ब्लॉक करा.
वाचा : तुमचं Google Account कुठे-कुठे केलंय साईन इन? चेक करण्यासाठी ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स