या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत या जागांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
पदभरतीचा तपशील :
भरले जाणारे पद : विधिज्ञ (कायदेतज्ज्ञ)
एकूण रिक्त पदसंख्या : २५ जागा
- मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली : ०२ जागा
- मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद / मा. कामगार न्यायालय, औरंगाबाद / मा. औद्योगिक न्यायालय, औरणगाबाद / मा. प्रशासकीय न्यायाधीकरण, औरंगाबाद (MAT) : १४ जागा
- मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड व तालुका न्यायालय : ०९ जागा
महत्त्वाचे :
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (अर्जाचा नमूना मूळ जाहीरातीमध्ये जोडण्यात आला आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
अर्ज करण्याची पद्धत :
० सदर पदभारतीमधील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने अर्ज, मा. मुखी कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, बीड यांचे नावे करणे गरजेचे आहे.
० तसेच, अर्जामध्ये कोणत्या न्यायालत काम करण्यासाठी इच्छुक आहात त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
० अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे, कायद्याची पदवी व पदवी असल्यास कायद्याची पदव्युत्तर पदवी (एलएलबी / एलएलएम) बार कौन्सिलकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केल्याचे प्रमाणपत्र, स्वयंम साक्षांकीत केलेल्या (Self-Attested) छायांकित प्रती (Xerox Copies) जोडाव्यात.
हे विसरू नका :
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर विहित वेळेत अर्ज पाठवणे गरजेचे आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी Notification (मूळ जाहीरात) काळजीपूर्वक वाचावी.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास असे अर्ज नाकारले जाऊन, या भरती प्रक्रियेत अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही.
जिल्हा परिषद, बीड अंतर्गत या भरतीची मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हा परिषद, बीड अंतर्गत या भरती प्रक्रियेतील अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हा परिषद, बीड अंतर्गत भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.