परंतु निकाल जाहीर झाल्यानंतरही त्या विद्यार्थ्याच्या पदवी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोणतेच आदेश आणि कार्यवाही केली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर काही वेळातच तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या पदविका प्रेवशाबाबतचे निर्देश जारी केले.
(वाचा: MPSC Exam News: ‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय..)
यानुसार दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदविका, तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेशाकरिता पात्र ठरवले आहे . त्यामुळे दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका आणि बारावी किंवा आयटीआयनंतर थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या संस्थास्तरीय जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रिया आता ८ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे.
तर बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. संस्थास्तरीय कोट्यामध्ये व कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्क्रूटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटिनीतून कागदपत्रे पडताळणी करून घ्यायची आहे. ऑनलाइन अर्ज निश्चिती झाल्यानंतर उमेदवारांनी प्रवेशासाठी संबंधित संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. व संस्थेने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
(वाचा: RRC Central Railway Apprentice Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती! आजच करा अर्ज..)