टॅबलेटची किंमत
Lenovo Tab P12 ची किंमत ३४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट स्टॉर्म ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. ह्या टॅबलेटची खरेदी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटसह आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून मर्यादित कालावधीसाठी ऑफर्ससह सुरु होईल.
वाचा: अँड्रॉइडचा बादशहा येतोय बाजारात; Google Pixel 8 सीरीजची लाँच डेट कंपनीनं सांगितली
Lenovo Tab P12 चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Tab P12 मध्ये १२.७ इंचाचा एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो २९४४×१८४० पिक्सल रेजोल्यूशन आणि ४०० निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चा वापर करण्यात आला आहे. डिजाइन पाहता ह्यात मेटॅलिक बॅक पॅनल मिळतो. टॅबलेटचं वजन ६१५ ग्राम आहे आणि जाडी ६.९मिमी आहे.
टॅबलेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जोडीला ८जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम RAM आणि २५६जीबी यूएफएस २.२ स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते. हा टॅब अँड्रॉइड १३ ओएसवर चालतो.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टॅबलेटच्या फ्रंटला १३मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागच्या बाजूला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे. टॅबमध्ये १०,२००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा टॅबलेट एकदा फुल चार्ज केल्यावर १० तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक देतो.
वाचा: Free Fire Unban in India: पबजीनंतर आता फ्री फायर करणार भारतात पुनरागमन; जाणून घ्या कधी करता येईल हा गेम डाउनलोड
टॅबलेटमध्ये कनेक्टिवटीसाठी वायफाय ६, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ ५.१ देण्यात आला आहे. ऑडियोसाठी टॅबलेटमध्ये जेबीएलचा क्वॉड स्पिकर सेटअप मिळत आहे. सिक्योरिटीसाठी पावर बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.