या भरती अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवेची व अत्यंत गरजेची पदे भरण्यात येणार आहे. नुकतीच या पद भरतीला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी पाठवलेल्या १८२ रिक्त व आवश्यक पदांच्या भरतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. यामध्ये पाणीपुरवठा, अग्निशमन तसेच आरोग्य विभागातील काही पदांचा समावेश आहे.
(वाचा: University News: सर्व अभ्यासक्रमांची पुस्तके तात्काळ मराठीतून उपलब्ध करा! तंत्रशिक्षण विभागाचे विद्यापीठांना आदेश)
कोल्हापूर महानगरपालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामळे पालिकेच्या कामकाजावरही याचा परिणाम होत आहे. सध्या शासनाने १८२ पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली असली तरी अजून अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे किमान ५५० पदे तरी भरण्यात यावी अशी मागणी महापालिका कर्मचारी संघाकडून करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडील रिक्त व तातडीची पदे भरण्याबाबत आदेश काढले होते. त्यासंदर्भात प्रत्येक महापालिकेकडून माहिती मागवली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगर पालिकेने १८२ पदे भरण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ज्याला नगरविकास खात्याने मंजुरी दिली. आता मंजुरी मिळाल्याने पालिका ही भरती प्रक्रिया लवकरच राबवणार आहे.
या भरती मध्ये विविध संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याकरिता सामान्य प्रशासनाने निर्देश दिलेल्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. तसेच शासनाने नमूद केलेल्या संस्थेमार्फत पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या मंजुरीमुळे महापालिकेतील आवश्यक पदे भरता येणार आहेत. पाणीपुरवठा, अग्निशमन व सफाई अशा अत्यावश्यक सेवेशी निगडित असलेल्या विभागात रिक्त पदे भरली जाणार असल्याने कामकाजात होणारी अडचण आता दूर होण्यास मदत होईल.
(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)