हायलाइट्स:
- वाशिममध्ये आगळेवेगळे रक्षाबंधन
- मुलींनी झाडांच्या बियांपासून तयार केल्या राख्या अन्…
- वृक्षांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची घेतली शपथ
वाशिम : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची महिमा विशद करणारा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर भाऊ आपल्या बहिणीला आजन्म रक्षण करण्याची ग्वाही देत असतो. यातही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनाचही संरक्षण झालं पाहिजे म्हणून याच दिवसाच औचित्य साधून रक्षाबंधन वेगळी पध्दतीने साजरा केला. मुलींनी बोर, चारोळी, सुपारी, पुदिना, मोहरी तांदूळ, गहू, उडीद, मूग, तूर जवस अशा वेगवेगळ्या वनस्पतीच्या बियांपासून राख्या तयार केल्या आणि या राख्या आपल्या भावांना बांधून त्या बियांपासून नवीन झाडं लावण्याची विंनती केली.
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील गोभणी येथील श्री शिवाजी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. केनवडकर सरांच्या संकल्पनेतून ही पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी असणाऱ्या राख्याची निर्मिती केली. सोबतच शाळेतील वृक्षांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली. यावेळी मुलींनी शाळेतील सर्व शिक्षकांना राख्या बांधल्या आणि प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येकी किमान एक झाड लावण्याचे अभिवचन दिले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काळे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले तर पोघे, घायाळ, लंबे सरांनी आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरणातील वृक्षाचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे सर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा बोडखे सर, प्रा. लंबे सर , सोमटकर सर , घायाळ सर , घोटे सर, लेमाडे सर , पोघे सर अंभोरे मॅडम उपस्थित होते.