एसबीआयमध्ये महाभरती; देशभरातील विविध राज्यांमध्ये ६ हजारांहून अधिक जागांवर नोकरीची संधी

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करनायत आली आहे. एसबीआयच्या या भरती अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील.

सदर भरती अंतर्गत स्टेंट बँक ऑफ इंडिया मधील तब्बल ६ हजार १६० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, प्रवेश शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला या लेखाच्या मध्यमतौं मिळेल.

पदभरतीचा तपशील आणि आरक्षण विषयक :

  • भारतातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशा ३३ ठिकाणच्या विविध भागांमधील एसबीआयच्या शाखांमध्ये आणि कार्यालयांसाठी ही भरती असणार आहे.
  • विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनुसार उपलब्ध जागांची माहिती जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • विविध राज्यानुसार तिथल्या स्थानिक किंवा भाषेचे ज्ञान असणार्‍या उमेदवारला अर्ज करण्याची मुभा आहे.

(अधिक महितीसाठी एसबीआयच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा)

वयोमर्यादा :

स्टेट बँक ऑफ इंडियाने या भरती प्रक्रिये संदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहीरातीमधील माहितीनुसार एसबीआयमधी या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे असावे.

(वाचा : महाराष्ट्र आरोग्य विभागात जवळपास ११ हजार पदांसाठीची पदभरती जाहीर; अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

शैक्षणिक पात्रता :

एसबीआयमधील या जागांच्या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यपीठामधील पदवीधर असणे आवश्यक आहे.

अशी पार पडणार निवड प्रक्रिया :

  1. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीचा समावेश असेल.
  2. लेखी परीक्षेत प्रत्येकी १ गुण या प्रमाणे चार विभागांमध्ये प्रत्येकी २५ प्रश्नांप्रमाणे एकूण १०० प्रश्न असतील.
  3. सदर परीक्षेचा कालावधी ६0 मिनिटांचा असून, ही परीक्षा इंग्रजी भाषेत पार पडेल.
  4. वरील चाचणी वगळता, लेखी परीक्षेसाठी १३ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न सेट केले जातील. इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या भाषांमध्येही परीक्षा घेतली जाईल.

(अधिक महितीसाठी मूळ जाहीरात पाहा)

वेतन विषयक :

सदर भरतीमध्ये निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्ष प्रशिक्षण (Training) देण्यात येईल. प्रशिक्षण काळात या उमेदवारांना १५ हजार रुपये स्टायपेंड (Stipend) देण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मानधनासाठी हे उमेदवार पात्र ठरणार नाहीत.

(वाचा : ICG Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात काम करायचे आहे; १ सप्टेंबरपासून सुरु होणार भरती प्रक्रिया)

अर्ज शुल्क :

या भरतीमधील जागांसाठी अर्ज करताना उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना ३००रुपये शुल्क भरावे लागेल.
तर, SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

(अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार SBI च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.)

महत्त्वाच्या तारखा आहेत :

० अर्ज सुरू होण्याची तारीख : १ सप्टेंबर २०२३
० अर्ज करण्याची शेवटची तारीख :२१ सप्टेंबर २०२३
० लेखी परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३

महत्त्वाचे :

  • एसबीआयच्या भरती प्रक्रियेत उमेदवारला कोणत्याही एका राज्याची निवड करून अर्ज करता येणार आहे.
  • अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज शुल्क न भरल्यास हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी नियम, अटी आणि पात्रेविषयी आवश्यक सगळी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर उमेदवाराने अर्जाची प्रत पाठवण्याची गरज नाही.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका लिंकवर अर्ज करणे गरजेचे आहे.

https://nsdcindia.org/apprenticeship
https://apprenticeshipindia.org
http://bfsissc.com
https://bank.sbi/careers
https://www.sbi.co.in/ careers

(वाचा : ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ साठी आमदार रोहित पवार आग्रही; सरळसेवा भरतीसाठी One Time Registration तर, परीक्षेसाठी कमी शुल्क घेण्याची मागणी)

Source link

Banking Jobspan indiasbi apprenticesbi apprentice recruitment 2023sbi job vacancysbi jobsSBI Recruitment 2023state bank of indiaएसबीआयस्टेट बँक ऑफ इंडिया
Comments (0)
Add Comment