एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये ९९८ पदांसाठी मेगाभरती! आजच करा अर्ज..

AIATSL Recruitment 2023: भारतीय विमान सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ‘एआयएटीएसएल’ म्हणजेच एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये (Air India Air Transport Services Limited) भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती अंतर्गत हँडीमन आणि युटिलिटी एजंट या पदांच्या एकूण ९९८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच या भरती संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती २०२३ मध्ये भरल्या जाणाऱ्या पदांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबईमध्ये असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तर १८ सप्टेंबर २०२३ ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.

या भरतीचे इतर तपशील पुढीलप्रमाणे….

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:

पदाचे नाव – पदसंख्या
हॅंडीमन – ९७१
युटिलिटी एजंट – २७ (पुरुष २० + महिला ७)
एकूण रिक्त पदे – ९९८

(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)

पात्रता:

हॅंडीमन – १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि इंग्लिश, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान.
युटिलिटी एजेंट – १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान.

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गासाठी वयोमार्यादा कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २८ वर्षे आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर मागासवर्गीय प्रवर्गाला ५ वर्षांची सूट आहे.

अर्ज शुल्क:

खुला आणि ओबीसी प्रवर्गाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गाला आणि माझी सैनिक यांना शुल्क माफ आहे .

या भरतीच्या अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडचे अधिकृत संकेतस्थळ: http://www.aiasl.in/

या भरती संबंधित सविस्तर माहिती वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Y3921uO9aNldWGWfFsLeCR7BaHLIDZ9e/view या लिंकला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२३

अर्ज या पत्त्यावर पाठवावा: एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९

(वाचा: MPSC Exam News: ‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय..)

Source link

aiatsl jobsaiatsl recruitmentaiatsl recruitment 2023air india air transport services limited jobsair india job opportunitiesAir India JobsCareer NewsJob News
Comments (0)
Add Comment