Asus Chromebook CX1400 चे स्पेसिफिकेशन
ह्या लॅपटॉपमध्ये ChromeOS आणि Intel Celeron N4500 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला Intel UHD ग्राफिक्स, ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या लॅपटॉपमध्ये ५०वॉटआव्हरची बॅटरी मिळते.
वाचा: रेडमी-रियलमीची सुट्टी करण्यासाठी सॅमसंगची तयारी सुरु; सर्वात स्वस्त सीरिजमधील Galaxy A05 आला समोर
Asus Chromebook CX1400 दोन मॉडेलमध्ये आला आहे. ह्याच्या एका मॉडेलमध्ये १४ इंचाचा अँटी ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. तर दुसरा टच स्क्रीन डिस्प्ले आहे. दोन्ही मॉडेल १९२०×१०८० पिक्सल रेजोल्यूशन, अॅस्पेक्ट रेशियो १६:०९ आणि रिफ्रेश रेट ६०हर्ट्झला सपोर्ट करतात. CX1400CKA मॉडेल नंबर असलेल्या लॅपटॉपचे वजन १.४७ किलोग्राम आहे. तर CX1400FKA चे वजन १.६३ किलोग्राम आहे.
Asus Chromebook CX1500 चे स्पेसिफिकेशन्स
ह्या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा अँटी-ग्लेयर फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १९२० X १०८० पिक्सल रेजोल्यूशन, ६०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६:०९ अॅस्पेक्ट रेशियो आहे. ह्यात ७२०पिक्सल एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.
तसेच लॅपटॉप मायक्रो एसडी कार्ड, ३.५मिमी ऑडियो जॅक आणि २ यूएसबी ३.२ जेन १ टाइप सी, २ यूएसबी ३.२ जेन १ टाइप-ए पोर्ट आहे. ह्यात ४२वॉटआव्हरची बॅटरी देण्यात आली आहे. लॅपटॉपमध्ये बिल्ट-इन मायक्रोफोन, बिल्ट-इन स्टीरियो २वॉट स्पिकर्स आणि गुगल असिस्टंट सारखे फीचर्स मिळतात. लॅपटॉपचे वजन १.८० किलोग्राम आहे.
वाचा: Vivo कडून ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट; दोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सची किंमत केली कमी
किंमत
Asus Chromebook CX1400 आणि CX1500 ची किंमत २१,९९० रुपयांपासून सुरु होते. परंतु मर्यादित कालावधीसाठी Flipkart वर हे १८,९९० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी करता येतील. ह्याची विक्री आज म्हणजे १ सप्टेंबरपासून सुरु होईल.