पनवेल महानगरपालिकेच्या भरतीला मुदतवाढ! आता अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख..

पनवेल महानगरपालिकेच्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा होता का? आणि मुदत संपल्यामुळे तुम्ही अर्ज करू शकला नाहीत का? असे असेल तर आता चिंतेचे कारण नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे अर्ज कारण्यासाठी तुम्हाला आता आणखी काही दिवस मिळणार आहेत.

पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळाला असून अवघ्या दोन दिवसांतच साडेचार हजारांहून अधिक अर्ज भरले गेले. शिवाय पुढेही उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे या भरतीला अर्ज करण्यासाठी पालिकेने आणखी काही दिवस वाढवून दिले आहे. या आधी या भरतीसाठी ३१ ऑगस्ट अंतिम तारीख होती पण आता १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती आयोजित करण्यात आली आहे . यामध्ये गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील जवळपास ४१ पदांची आणि ३७७ जागांसाठी सरळ सेवेमार्फत ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊया या भरतीचे सर्व तपशील…

(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)

भरती प्रक्रियेतील ३७७ जागांसाठी ही पदे…

‘अ’ गटातील पदे :
प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, क्षयरोग अधिकारी, मलेरिया अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी.

‘ब’ गटातील पदे :
नगर उपसचिव, महिला व बालकल्याण अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहायक नगर अधिकारी प्लॅनर, सांख्यिकी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.

‘क’ गटातील पदे :
अर्ध अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्रगण्य फायरमन, फायरम, ड्रायव्हर कम ऑपरेटर, फार्मासिस्ट, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, कर्मचारी परिचारिका (जनरल नर्सिंग मिडवाइफरी),, सहायक नर्सिंग मिडवाइफरी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (सिव्हिल).

‘क’ गटातील अन्य पदे :
हार्डवेअर / नेटवर्किंग) , सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सहायक कायदा अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघुलेखक – टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा), कनिष्ठ लिपिक (लेखापरीक्षण) , लिपिक सह टंकलेखक, चालक (जड वाहन), चालक (हलके वाहन) , व्हॉल्वमन / की- कीपर, बाग पर्यवेक्षक.

‘ड’ गटातील पदे :
माळी गट ड.

वयोमर्यादा :
खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे.
राखीव प्रवर्ग : १८ ते ४३ वर्षे.

नोकरीचे ठिकाण : पनवेल, रायगड.

अर्ज शुल्क :
गट अ आणि गट ब : खुला वर्ग १००० रुपये/ राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये.
गट क : खुला प्रवर्ग ८०० रुपये/ राखीव प्रवर्ग ७०० रुपये.
गट ड : खुला प्रवर्ग ६०० रुपये, राखीव प्रवर्ग ५०० रुपये.

अधिकृत वेबसाईट http://www.panvelcorporation.com/ ही असून भरतीचे सर्व तपशील ‘या’ लिंकवर पाहू शकता.

तसेच https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html या लिंक वर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता.

(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये ९९८ पदांसाठी मेगाभरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career Newseducation newsGovernment jobJob Newspanvel mahanagar palikapanvel mahanagar palika bhartipanvel mahanagar palika recruitmentpanvel municipal corporationpanvel municipal corporation bharti 2023panvel municipal corporation recruitment
Comments (0)
Add Comment