एयरटेल ब्लॅकचा २२९९ रुपयांचा प्लॅन
कंपनी या प्लॅनमध्ये फायबरसह लँड-लाइन कनेक्शन देत आहे. ह्यात इंटरनेटचा स्पीड ३००एमबीपीएसचा अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल. कंपनी ह्या प्लॅनमध्ये डीटीएचवर ३५० रुपयांचे टीव्ही चॅनेल्स दिले जातात. तसेच ह्या प्लॅनसह तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त चार्जविना Xstream Box देखील मिळेल. हा प्लॅन चार पोस्टपेड मोबाइल कनेक्शनसह येतो.
वाचा: फोन लाँच झाला नाही तरीही जाहिरात झळकली; बजेटमध्ये १२जीबी रॅम देणाऱ्या मोबाइलची किंमत समजली
ह्या सर्वांना २४०जीबी डेटा वापरता येतो. प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देत आहे. त्याचबरोबर ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला एक फ्री लँडलाइन कनेक्शन देखील मिळेल. ह्या प्लॅनमध्ये कंपनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि एयरटेल एक्सट्रीम अॅपचा मोफत अॅक्सेस देत आहे.
वाचा: जगात सर्वाधिक कोणते फोन विकले जातात? ‘ही’ पाहा यादी
जिओकडे आहे असाच प्लॅन
रिलायन्स जिओ फायबरचा १४९९ रुपयांचा प्लॅन ३००एमबीपीएसच्या इंटरनेट स्पीडसह येतो. ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळत आहे. वर्षभराचा प्लॅन घेतल्यास ३० दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देखील मिळेल. जिओ ह्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग देत आहे. हा प्लॅन ५५० पेक्षा जास्त ऑन-डिमांड टीव्ही चॅनेल्स देतो. प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स बेसिक, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार, सोनी लिव, जिओ सिनेमा आणि झी५ सह अनेक ओटीटी अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.