शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थापना दिन कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः याची घोषणा केली. या कार्यक्रमात संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, एनसीईआरटी हे सुरुवातीपासूनच संशोधन आणि प्रशिक्षणाचे काम करत आहे. ही राष्ट्रीय स्तरावरची एक महत्वाची संस्था आहे, म्हणूनच याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. आता देशातील क्षेत्रीय आणि राज्य शिक्षण परिषदा या ‘एनसीईआरटी’च्या ऑफ कॅम्पसच्या स्वरुपात काम करणार आहे.
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये ९९८ पदांसाठी मेगाभरती! आजच करा अर्ज..)
‘एनसीईआरटी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर त्या मार्फत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे अभ्यासक्रम सुरू होऊ शकतात. तसेच ‘एनसीईआरटी’ला अनेक प्रकारच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत ठरविण्याची जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. परंतु यासंबंधी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. लवकरच या सर्व गोष्टींसंबंधी शिक्षण मंत्रालयाकडून सविस्तर माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
‘एनसीईआरटी’ ही देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेची एक थिंकटँक आहे. भारतात शालेय शिक्षणासाठी पाठ्यापुस्तके निर्माण करणारी आघाडीची संस्था आहे. तसेच नवे राष्ट्रीय धोरण लागू करण्याची जबाबदारी देखील ‘एनसीईआरटी’कडे आहे. याशिवाय संशोधन, प्रशिक्षण, पाठ्यपुस्तकांचा विकास, अभ्यासक्रम निर्मितीसह शिक्षण सामग्रीच्या क्षेत्रातही ‘एनसीईआरटी’ कार्यरत आहे.
(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)