एलन मस्कनी केली घोषणा
इलॉन मस्कनं घोषणा केली आहे की लवकरच एक्स प्लॅटफॉर्मवर ऑडियो आणि व्हिडीओ कॉल करण्याचा पर्याय मिळेल. ह्याचा थेट परिणाम व्हॉट्सअॅपवर होऊ शकतो. इलॉन मस्क व्हॉट्सअॅप युजर्सना ट्विटरकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपचा मालक मार्क जुकरबर्ग समोर नवीन आव्हान निर्माण झालं आहे. परंतु युजर्सना व्हिडीओ आणि ऑडियो कॉलिंगसाठी नवा पर्याय मिळेल ज्यामुळे युजर्सना खूप फायदा होईल.
वाचा: २२ हजारांच्या बजेटमध्ये Asus चे दोन शानदार लॅपटॉप लाँच; विद्यार्थ्यांसाठी आहेत बेस्ट
एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलिंग आणि ऑडियो कॉलिंगचा लाभ अँड्रॉइड तसेच आयओएस युजर्स देखील घेऊ शकतील. तसेच मॅक आणि पीसीवर देखील व्हिडीओ आणि कॉलिंगचा ऑप्शन मिळेल, परंतु ही सुविधा फक्त ब्लू सब्सक्रिप्शन म्हणजे पेड युजर्सना मिळण्याची ही मिळेल. इलॉन मस्कनं मात्र ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही परंतु ही प्रीमियम सर्व्हिस असू शकते.
सिक्योरिटीवर जास्त भर
एक्स प्लॅटफॉर्मवरून ऑडियो किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी मोबाइल नंबरची गरज नसेल. त्यामुळे एक्सवरील व्हिडीओ आणि ऑडियो कॉल जास्त सुरक्षित म्हणता येईल. कारण तुमचा नंबर कोणाकडे जात नाही आणि फ्रॉड होण्याची शक्यता देखील कमी होते.
वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत येतोय शानदार स्मार्टफोन; OPPO A38 ची किंमत लाँचपूर्वीच झाली लीक
व्हॉट्सअॅप आणि एक्सवर व्हिडीओ आणि ऑडियो कॉलिंग सुविधा मिळाल्यामुळे सामान्य मोबाइल आणि मेसेजिंग पूर्णपणे संपुष्टात येणार नाही. परंतु ह्यात घट होऊ शकते. देशभरात ५जी सर्व्हिस लाँच झाल्यानंतर डेटाचा वापर वाढेल. त्यामुळे इंटरनेट कॉलिंग सुधारेल. आशा आहे की नॉर्मल कॉलिंग कमी होईल.