केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगात ७५४७ पदांची महाभरती! आजच अर्ज करा..

केंद्र सरकारच्या (एसएससी’ म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने एक नाही दोन नाही तर तब्बल ७ हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या ७५४७ रिक्त जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून आयोगाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरतीद्वारे नियुक्त केलेले उमेदवार दिल्ली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून रुजू होणार आहेत. या भरतीसाठी १०वी पास आणि उच्च माध्यमामिक शिक्षण असणे गरजेचे आहे. तुम्हीही या पदांसाठी उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ३० सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कर्मचारी निवड आयोगाच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या
कॉन्स्टेबल – ७५४७ जागा

वेतनश्रेणी: २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये.

शैक्षणिक पात्रता: १०+२ (उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण)

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी १८ ते २५ वर्षे तर कमाल वयोमर्यादेत ओबोसी प्रवर्गाला ३ वर्षे तर एससी/एसटी वर्गाला ५ वर्षे सूट.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी खुल्या वर्गाला १०० रुपये अर्ज शुल्क आहे तर महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३

कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाईट: ssc.nic.in

या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/12TQ50zF7cMYiBViSxp2fP4VIyRsKs9DT/view या लिंकवर क्लिक करा.

या भरतीसाठी अर्ज कसा करावा:

  • अर्ज वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • त्यानंतर आवश्यक त्या तपशिलांची पूर्तता करून अर्ज भरा.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्यातील फील्डमध्ये योग्य तपशील भरल्याचे तपासून घ्या,
  • चुकलेला अर्ज पुन्हा दुरुस्त करण्याची मुभा या भरती प्रक्रियेत नाही.

भरती प्रक्रिया: या प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. हि परीक्षा संगणकप्रणालीवर आधारित १०० गुणांची असेल. यामध्ये सामान्य ज्ञान, सामान्य गणित, जागतिक घडामोडी यावर आधारित काही प्रश्न असतील. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक पात्रता तपासली जाईल, मग मेडिकल टेस्ट होऊन अंतिम निवड केली जाईल.

(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये ९९८ पदांसाठी मेगाभरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career Newseducation newsgovernment jobsJob NewsSSC bharti for constableSSC Recruitmentstaff selection commission constable vacancystaff selection commission jobsstaff selection commission recruitmentstaff selection commission recruitment 2023
Comments (0)
Add Comment