महाराष्ट्र राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिक्षक अशा ‘गट- अ’च्या अधिकारी संवर्गातील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ५ सप्टेंबर २०२३ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल तर २५ सप्टेंबर हि अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
‘एमपीएससी’अंतर्गत २६६ पदांच्या भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे..
पदांची नावे आणि पदसंख्या
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – १४९ जागा
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – १०८ जागा
सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ – ६ जागा
वैद्यकीय अधिक्षक, गट-अ – ३ जागा
एकूण रिक्त जागा – २६६
(वाचा: SSC Recruitment 2023: केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगात ७५४७ पदांची महाभरती! आजच अर्ज करा..)
वेतनश्रेणी:
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – ५७ हजार ७०० रुपये
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – ,३१ हजार ४०० रुपये
सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ – ५७ हजार ७०० रुपये
वैद्यकीय अधिक्षक, गट-अ – ७२ हजार ६०० ते २ लाख १६ हजार ६०० रुपये.
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सविस्तर अधिसूचना वाचावी.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ सप्टेंबर २०२३
भरतीचे तपशील जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट:mpsc.gov.in
https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 या लिंकवर भेट देऊन त्यामध्ये प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र अधिसूचना पीडीएफ स्वरूपात वाचता येईल.
परीक्षेचे स्वरूप: अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पदांसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. हि परीक्षा २०० गुणांसाठी असून २ प्रश्नपत्रिका असतील. लेखी परीक्षेबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरच प्राप्त होतील. या परीक्षेच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
(वाचा: Panvel Corporation Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेच्या भरतीला मुदतवाढ! आता अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख..)