मडगाव नगरपरिषदेमध्ये नोकरीची संधी; ४३ रिक्त जागांसाठी १६ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

Margao Municipal Council Recruitment 2023: मडगाव नगरपरिषद, गोवा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, तांत्रिक अधीक्षक आणि कनिष्ठ मेकॅनिक पदाच्या एकूण ४३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांना १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे.

(फोटो सौजन्य : Margao Municipal Council अधिकृत वेबसाइट)

पदभरतीचा तपशील :

संस्था : मडगाव नगरपरिषद, गोवा

एकूण रिक्त पदसंख्या : ४३

1. निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) : ८ पदे
2. सहाय्यक मेसन (Assistant Mason) : १ पदे
3. कामगार (Workers) : ३४ पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२३

(वाचा : Tattoo Artist म्हणून फुलटाइम किंवा फ्रिलान्स काम करणे हाही करिअरचा उत्तम पर्याय; नाव आणि पैसा मिळवून देणारी संधी)

वयोमार्यादा :

मडगाव नगरपरिषद, गोवा इथल्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारचे वाय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(वयोमार्यादेतील क्षिथिलता आणि आरक्षणाविषयी अधिक महितीसाठी मूळ जाहिरात पाहा)

अशी पार पडणारा निवड प्रक्रिया :

मडगाव नगरपरिषद, गोवा येथील भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल.
Subjective and Objective अशा दोन्ही पद्धतीच्या प्रश्नांवर आधारित १०० गुणांची परीक्षा देणे अनिवार्य असेल.
या परीक्षेतील गुणांच्या आधारे पुढील फेर्‍यांसाठी उमेदवारञ्चि निवड करण्यात येईल.

(वाचा : SBI मध्ये तब्बल ६ हजार १६० जागांसाठी भरती; देशाच्या विविध राज्यांमध्ये नोकरीची संधी)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) :
१) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता.
२) किमान तीन महिन्यांच्या कालावधीचे संगणक शिक्षणाचे प्रमाणपत्र
३) कोकणी, आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

सहाय्यक मेसन : किमान चौथी पास, कोकणी, आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

कामगार : किमान चौथी पास, कोकणी, आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

असा करा अर्ज :

1. या पदासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
2. ऑनलाइन अर्जाची प्रत (Hardcopy) कॉपी पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन (मूळ जाहीरात) काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

(वाचा : ICG Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात काम करायचे आहे; १ सप्टेंबरपासून सुरु होणार भरती प्रक्रिया)

Source link

Goagovernment of goajob openingmargao municipal councilmargao municipal council recruitmentmargao municipal council recruitment 2023mmc goa
Comments (0)
Add Comment