राज्य शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येते. याद्वारे मंगळवारी,. ५ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे हा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यातून अनेक दिव्यांगांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे हा मेळावा होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जी समिती विविध समित्यांद्वारे या मेळाव्याचे आयोजन, नियोजन पाहणार आहेत. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांचे ३० हून अधिक एम्प्लॉयमेंट स्टॉल्स येणार आहेत.
(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’अंतर्गत २६६ पदांची भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)
रोजगाराचे सोबतच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ यावेळी उपस्थित दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे. हा रोजगार मेळावा दिव्यांगांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण ५० हुन अधिक जागांवर या उमेदवारांची खात्रीशीर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे त्या-त्या पदांसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून मुलाखतीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक व जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणी कशी करायची…
या रोजगार मेळाव्या संबधी अधिक माहिती मिळवण्यासाठी www. mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन employment टॅबवरील जॉब सिकर हा पर्याय निवडावा.
त्यानंतर आपला नोंदणी / आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड टाकून होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावा. पुढे त्यातील ‘नाशिक’ जिल्हा निवडा व फिल्टर पर्यायावर क्लिक करा.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ‘दिव्यांगांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ या ओळीतील अॅक्शन मेन्यूतील दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा.
पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी अप्लाय या पर्यायावर क्लिक करा.
(वाचा: AIATSL Recruitment 2023: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये ९९८ पदांसाठी मेगाभरती! आजच करा अर्ज..)