Nokia G42 5G ची संभाव्य किंमत
कंपनीनं जरी अधिकृत घोषणा केली नसली तरी नोकिया जी४२ ५जी फोन ६ सप्टेंबरला भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन जागतिक बाजारात आधीच आला आहे. तिथे ह्याची किंमत १९९ डॉलर्स म्हणजे सुमारे १६००० रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारात Nokia G42 5G १५ हजारांच्या आसपास उपलब्ध होऊ शकतो.
वाचा: फक्त स्मार्टफोन नव्हे तर स्वस्त इअर बड्सही येणार; Realme Narzo 60x च्या लाँचची तारीख समजली
Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया जी४२ ५जी फोन ७२० × १६१२ पिक्सल रिजोल्यूशनसह ६.५ इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एलसीडी पॅनलवर ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. पावर बॅकअपसाठी नोकिया जी४२ ५जी फोनमध्ये ५,०००एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी २०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.
नोकिया जी४२ ५जी फोन अँड्रॉइड १३ वर चालतो. जोडीला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८०+ ऑक्टाकोर प्रोसेसरची ताकद मिळते. ह्यात ६जीबी पर्यंत रॅम आहे आणि १२८जीबी स्टोरेज मिळते. हा ड्युअल सिम फोन आहे जो ५जीसह ४जीला देखील सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी५२ रेटिंग देण्यात आली आहे.
वाचा: WhatsApp वापरता? मग या महत्त्वाच्या ४ सेटिंग्ज आताच करा ऑन, नाहीतर…
फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.