पदवीधारक उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १५० पदांसाठी पार पडणार निवड प्रक्रिया

NABARD Recruitment For Assistant Manager: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (National Bank For Agriculture & Rural Development) च्यावतीने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरती अंतर्गत १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सदर भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदभारतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १५०

पदनिहाय जागांची संख्या :

१. जनरल (General) : ७७ जागा
२. कम्प्युटर / आयटी (Computer/ Information Technology) : ४० जागा
३. फायनान्स (Finance): १५ जागा
४. कंपनी सेक्रेटरी (CS-Company Secretary): ०३ जागा
५. सिव्हिल इंजिनीअर (Civil Engineer) : ०३ जागा
६. इलेक्ट्रिकल इंजिनीअर (Electrical Engineer): ०३ जागा
७. जियो इन्फोर्मेशन (Geo Information) : ०२ जागा
८. फोरेस्टरी (Forestry): ०२ जागा
९. फूड प्रॉसेसिंग (Food Processing) : ०२ जागा
१०. स्टॅटेस्टिक (Statistics) : ०२ जागा
११. मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट (Mass Communication/Media Specialist) : ०१ जागा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

(वाचा : SBI मध्ये तब्बल ६ हजार १६० जागांसाठी भरती; देशाच्या विविध राज्यांमध्ये नोकरीची संधी)

शैक्षणिक पात्रता :

  • जनरल : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, तर राखीव प्रवर्गातील उमेदवार ५५ टक्के गुणांसह पदवीधर किंवा MBA/ PGDM किंवा CA/ CS/ ICWA किंवा Ph.D.
  • कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजि कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
  • फायनान्स : ६० टक्के गुणांसह फायनान्स/ बँकिंग विषयात BBA/ BMA किंवा ५५ टक्के गुणांसह मॅनेजमेंट (फायनान्स) विषयात PG डिप्लोमा किंवा फायनान्स विषयात MBA/ MMS किंवा ६० टक्के गुणांसह फायनांसीअल आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विषयात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA/ CFA/ ICWA.
  • कंपनी सेक्रेटरी : कोणत्याही शाखेतील पदवी + CS.
  • सिव्हिल इंजिनीअरिंग : ६० टक्के गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग : ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • जिओ इन्फॉर्मेटिक : ६० टक्के गुणांसह जिओ इन्फॉर्मेटिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • फॉरेस्ट्री : ६० टक्के गुणांसह फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • फूड प्रोसेसिंग : ६० टक्के गुणांसह फूड प्रोसेसिंग/ फूड टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • स्टॅटेस्टिक : ६० टक्के गुणांसह स्टॅटेस्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  • मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट : ६० टक्के गुणांसह मास मीडिया/ कम्म्युनिकेशन/ जनरलीजम/ अड्वर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित विषयात डिप्लोमा.

(वाचा : DTE Maharashtra Recruitment 2023: शासनाच्या तंत्रशिक्षण विभागात नोकरीची संधी; दहावीपास ते पदवीधर उमेदवारांसाथी सुवर्णसंधी)

वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग : २१ ते ३० वर्षे.
ओबीसी : ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय : ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क :

खुला/ ओबीसी/ EWS : ८०० रुपये
मागासवर्गीय/ PwBD : १५० रुपये

(सदर भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असून, हे अर्ज शुल्क विना-परतावा Non Refundable तत्वावर घेण्यात येईल)

महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात : २ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ सप्टेंबर २०२३

असा करा अर्ज :

१. National Bank For Agriculture & Rural Development (NABARD) मधील जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.

२. नाबार्ड भरतीचा अर्ज, ऑनलाइन अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्र आपलो करणे गरजेचे असणार आहे.

३. नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त इतर मार्गानी प्राप्त झालेले अर्ज, आणि दिलेल्या तारखेनंतर भरले जाणारे अर्ज नाकारले जाऊन, सदर भरतीसाठी अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

(वाचा : ICG Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात काम करायचे आहे; १ सप्टेंबरपासून सुरु होणार भरती प्रक्रिया)

महत्त्वाच्या लिंक्स :

नाबार्ड भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी नाबार्डच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा. (मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

नाबार्डच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

assistant managerCompany SecretaryComputer Information TechnologyEngineer Jobs At NabardMass CommunicationMedia SpecialistNABARDNABARD Recruitment 2023nabard.orgNational Bank For Agriculture & Rural Developmentराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
Comments (0)
Add Comment