मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्‍यांसाठी आजच करा अर्ज..

MIDC Recruitment 2023 In Mumbai: नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘एमआयडीसी’ म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महाभरतीचे आयोजन केले आहे. ज्यामधे गट अ ते गट क च्या विविध अधिकार्‍यांची आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. या भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया..

या भरती प्रक्रियेतील पदे आणि पदसंख्या:

गट अ
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – ३
उप अभियंता (स्थापत्य) – १३
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) – ३
सहयोगी रचनाकार – २
उप रचनाकार – २
उप मुख्य लेखा अधिकारी – २

गट ब
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – १०७
सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी) – २१
सहाय्यक रचनाकार – ७
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ – २
लेखा अधिकारी – ३
क्षेत्र व्यवस्थापक – ८

गट क
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १७
कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) – २
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १४
लघुलेखक (निम्न श्रेणी) – २०
लघुटंकलेखक – ७
सहाय्यक – ३
लिपिक टंकलेखक – ६६
वरिष्ठ लेखापाल – ६
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) – ३२
वीजतंत्री (श्रेणी-२) – १८
पंपचालक (श्रेणी-२) – १०३
जोडारी (श्रेणी-२) – ३४
सहाय्यक आरेखक – ९
अनुरेखक – ४९
गाळणी निरिक्षक – २
भूमापक – २६
विभागीय अग्निशमन अधिकारी – १
सहायक अग्निशमन अधिकारी – ८
कनिष्ठ संचार अधिकारी – २
वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) – १
चालक यंत्र चालक – २२
अग्निशमन विमोचक – १८७

(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’अंतर्गत २६६ पदांची भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

भरतीसाठीची एकूण रिक्त पदे – ८०२

नोकरी ठिकाण :

मुंबई

शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता त्या-त्या पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरातीची लिंक वाचावी.

वयोमार्यादा:

प्रत्येक गटातील विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमार्यादा असून त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरातीची लिंक वाचावी.

अर्ज शुलक:

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क असून मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क आकरण्यात आले आहे.

अर्ज पद्धती:

ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

२५ सप्टेंबर, २०२३

अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ : www.midcindia.org

भरतीची सविस्तर जाहिरात https://drive.google.com/file/d/18O9w979GNLERTKD5LIWagbmbjlYidQmW/view या लिंकवर वाचता येईल.

तर https://ibpsonline.ibps.in/midcaug23/ या लिंकरून थेट अर्ज करू शकता.

(वाचा: Jobs For Handicapped: नाशिक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी उद्या रोजगार मेळावा; जाणून घ्या कशी करायची नोंदणी…)

Source link

Career Newseducation newsgovernment jobsjob in midcJob Newsmidcmidc job 2023midc mumbai jobsmidc mumbai vacancyMIDC recruitment 2023
Comments (0)
Add Comment