‘यूजीसी’चा मोठा निर्णय! आता पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल.. वाचा सविस्तर..

विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण हे विद्यापीठांच्या माध्यमातून होत असते. पदवी शिक्षणानंतर नोकरी आणि अन्य महत्वाच्या गोष्टी अवलंबून असल्याने विद्यार्थी पदवीमध्ये उत्तम श्रेणी मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या अंतिम परीक्षांचे गुणांकन हे विद्यापीठाकडून केले जाते आणि त्या आधारावर त्यांना निकाल आणि पदवी प्रमाणपत्र दिले जाते. परंतु आता विद्यापीठ अनुदान आयोगाने या पदवी प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रात एक मोठा बदल करण्याचे निर्देश यूजीसीने (UGC) दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आणि निकाला बाबत कायमच गोपनीयता पाळली जाते. त्यांचा आधार क्रमांक ही त्यांची महत्वाची ओळख असल्याने तो कुठेही प्रसिद्ध केला जात नाही. विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि प्रमाणपत्रांवरही त्याची नोंद नसते. आधार क्रमांक ही सार्वजनिक करण्याची बाब नाही, त्याबाबत काही सक्तीचे नियम घालून देण्यात आले आहेत. परंतु याच नियमाला देशातील अनेक विद्यापीठांनी हरताळ फासला होता. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर जाहीर केले जेले. हा प्रकार उघडकीस येताच त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grant Commison) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

(वाचा: Jobs For Handicapped: नाशिक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी उद्या रोजगार मेळावा; जाणून घ्या कशी करायची नोंदणी…)

देशातील काही विद्यापीठे आणि राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर त्यांचा आधार क्रमांक प्रसिद्ध केला जात आहे. परंतु हा आधार क्रमांक प्रसिद्ध करणे चुकीचे असून ते तातडीने थांबवायला हवे असे युजीसीने म्हणणे आहे. या संदर्भात यूजीसीने सूचना जारी केल्या असून विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक प्रसिद्ध करून तो सार्वजनिक करता येणार नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. प्रमाणपत्रांवरील आधार क्रमांक छपाईला विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रतिबंध केल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या ओळखी बाबतची गोपनीयता कायम राखली जाईल.

नेमके झाले काय?

महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतानाच सर्व कागदपत्रे मागवली जातात. यामध्ये आधार कार्ड हे महत्वाचे दस्तऐवज असल्याने प्रवेशा वेळीच विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या संगणकीय प्रणालीत जातो. काही विद्यापीठांनी तर विद्यार्थ्यांचे हे आधार क्रमांक थेट पदवी प्रमाणपत्रांवर छापण्याचा प्रकार केला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हे लक्षात येताच आयोगाने यास प्रतिबंध केला. तसेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या नियमांचे पालन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

(वाचा: MIDC Recruitment 2023: मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्‍यांसाठी आजच करा अर्ज..)

Source link

Career Newseducation newsugc guidelinesugc latest newsugc newsugc normsugc rulesuniversity grants commission newsuniversity grants commission noticeuniversity news
Comments (0)
Add Comment