Xiaomi Uniblade ट्रिमर लाँच! मिळेल ट्रिम आणि शेवचा ऑप्शन, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

शाओमीनं आपला नवा ट्रिमर लाँच केला आहे. ज्याला शाओमी यूनीब्लेड ट्रिमर असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीनं दावा केला आहे की हा ट्रिमर तुमच्या शेविंग, ट्रिमिंगचा अनुभव आणखी शानदार बनवू शकतो. हा भारतात १,४९९ रुपयांमध्ये लाँच केला आहे. लाँच होताच हा ट्रिमर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याची विक्री शाओमीच्या अधिकृत वेबसाइटसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि शाओमी रिटेल स्टोरवरून देखील केली जाईल.

ह्या ट्रीमरची खासियत म्हणजे ह्यात ट्रिम ३ वे प्रिसाइज शेविंग हेड देण्यात आला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर हा ट्रिमर शेविंग ब्लेड प्रमाणे देखील वापरता येतो. त्यासाठी फक्त कव्हर हटवावे लागले. तसेच ट्रिमिंगचा देखील ऑप्शन मिळतो. यासाठी ग्रूमिंगसाठी देखील हा ट्रिमर वापरता येईल.

वाचा: स्वस्त चिनी फोन्सना नवा पर्याय येतोय; ६ सप्टेंबरला भारतात लाँच होत आहे Nokia 5G smartphone

स्पेसिफिकेशन्स

टिमर को आयपीएक्स७ रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा ट्रीमर पाण्यामुळे लवकर खराब होणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही हा पाण्यानं धुतला तरी हा ह्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ह्यात तुम्हाला १४ लेंथ सेटिंग देण्यात आली आहे. जिच्या मदतीनं तुम्ही दाढीची लेंथ किती ठेवायची ते सहज ठरवू शकता. कंपनीनं ह्यात अ‍ॅडव्हान्स मेश ब्लेडचा वापर केला आहे. तसेच रोटेटरी कोंब मिळते व्हर्सटाईल स्टाईलसाठी.

वाचा: ‘हे’ आहेत २० हजारांच्या आतील बेस्ट ५ फोन; कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत महागड्या मोबाइललाही टाकतील मागे

ट्रिमरमध्ये एक पावर बटन देण्यात आला आहे. जो ऑन करून ट्रिमर वापरता येईल. त्याचबरोबर ट्रिमरमध्ये एक एलईडी इंडिकेटर देण्यात आला आहे. तर खालच्या बाजूला यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे. ट्रिमर सिंगल चार्जमध्ये ६० मिनिटांपर्यंत वापरता येतो. ट्रिमर मॅट डिजाइनसह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर ह्यात ट्रॅव्हल लॉकचा ऑप्शन देण्यात आला आहे.

Source link

Xiaomixiaomi uniblade trimmerxiaomi uniblade trimmer launchxiaomi uniblade trimmer priceशाओमीशाओमी युनिब्लेड ट्रीमर
Comments (0)
Add Comment