शिष्यवृती परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खरा कस लागतो. त्यामुळे शाळाही या परीक्षेकडे विशेष लक्ष देतात. आता परीक्षेची तारीख जाहीर असल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
(वाचा: UGC Latest News: ‘यूजीसी’चा मोठा निर्णय! आता पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल.. वाचा सविस्तर..)
या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी नियमित वेळेपेक्षा अधिक उशीर झाल्यास विलंब शुल्क आकारले जाणार आहे. परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर नंतर विलंब शुल्कासह १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच, २४ ते ३१ डिसेंबर या काळात अति विशेष विलंब शुल्का भरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. मात्र, ३१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी या भाषांपैकी एक भाषा निवडून परीक्षा देऊ शकतात. शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे, त्या वयापेक्षा जास्त वय असणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात पण त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
वयोमार्यादा:
शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी – ११ वर्षे (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षे)
शिष्यवृत्ती परीक्षा आठवी- १४ वर्षे (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षे)
शासनमान्य शाळांमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून त्यासाठी परिषदेच्या www.mscepune.in किंवा https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इतर तपशील पाहू शकता. तर https://2024.mscepuppss.in/PDF/2024/Adhisuchana_2024_FINAL.pdf या लिंकवर तुम्हाला सविस्तर अधिसूचना वाचता येईल.
(वाचा: MIDC Recruitment 2023: मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्यांसाठी आजच करा अर्ज..)