स्वदेशी स्मार्टफोनचे पुनरागमन! Lava Agni 2 5G ची विक्री ५ सप्टेंबरपासून सुरू, २ हजार रुपयांचा डिस्काउंटही

Lava Agni 2 5G भारतीय बाजारात मे २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन बराच लोकप्रिय ठरला, त्यामुळे लाँच होताच काही दिवसांनी फोनचा स्टॉक संपला आणि विक्री बंद झाली. आता लावाचा हा स्मार्टफोन पुन्हा एकदा अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. चला जाणून घेऊया Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि ऑफर.

Lava Agni 2 5G ची किंमत आणि ऑफर

Lava नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून सांगितलं की फोन ५ सप्टेंबर, २०२३ पासून विक्रीसाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे. Amazon वरून ह्याची विक्री सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. दरम्यान स्मार्टफोनची किंमत कमी करण्यासाठी कंपनी HDFC आणि SBI बॅंकेच्या ग्राहकांना २,००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. लावा ५जी फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे, परंतु बँक ऑफर नंतर हा १९,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.

वाचा: ‘हे’ आहेत २० हजारांच्या आतील बेस्ट ५ फोन; कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत महागड्या मोबाइललाही टाकतील मागे

Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स

Lava Agni 2 5G मध्ये ६.७८ इंचाचा फुल-एचडी+ कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन २२२०x१०८० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर सह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो.सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.

वाचा: बँक अकाऊंट रिकामं होण्यापूर्वीच डिलीट करा ‘हे’ दोन फेक अँड्रॉइड अ‍ॅप्स; चिनी ग्रुपची करामत

फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. तसेच ह्यात सेल्‍फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Lava Agni 2 5G मध्ये ६६ वॉट फास्ट-चार्जिंग सपोर्टसह करने ४,७०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

agni 2 5glavalava agni 2 5g amazonlava agni 2 5g pricelava agni 2 5g price in indiaलावा
Comments (0)
Add Comment