वोडाफोन आयडियाचा ३६९ रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. ह्या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला रोज २जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त बेनिफिट देखील मिळतात. ह्यात ३० दिवसांच्या सोनी लिव मोबाइल सब्सक्रिप्शनसह Vi Movies & TV अॅपचा देखील मोफत अॅक्सेस मिळेल. प्लॅनमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट असे फायदे देखील मिळतात.
वाचा: ‘हे’ आहेत २० हजारांच्या आतील बेस्ट ५ फोन; कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत महागड्या मोबाइललाही टाकतील मागे
वोडाफोन आयडियाचा ९०३ रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. ह्या प्लॅनमध्ये कंपनी ९० दिवस सोनी लिव मोबाइलचं फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला रोज २जीबी डेटा मिळेल. रोज १०० फ्री एसएमएस मिळणाऱ्या ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. हा प्लॅन वीकेंड डेटा रोलओव्हरसह बिंज ऑल नाइट आणि डेटा डिलाइट्स बेनिफिट देखील देतो.
वाचा: स्वदेशी स्मार्टफोनचे पुनरागमन! Lava Agni 2 5G ची विक्री ५ सप्टेंबरपासून सुरू, २ हजार रुपयांचा डिस्काउंटही
प्लॅनमध्ये तुम्हाला Vi movies & TV अॅपचा फ्री अॅक्सेस देखील मिळेल. विशेष म्हणजे कंपनीच्या ८२ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील सोनी लिवचा फ्री अॅक्सेस मिळत आहे. ह्या प्लॅनचे सब्सक्रायबर २८ दिवस पर्यंत सोनी लिवचं कंटेंट पाहता येईल. हा एक डेटा प्लॅन आहे आणि ह्यात इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला ४जीबी डेटा मिळेल. प्लॅन १४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो.